IMPIMP

Changes From 1st June 2023 | जून महिना सुरु होताच होणार हे बदल; जाणून घ्या वाढत्या किंमती

by nagesh
Changes From 1st June 2023 | These changes will take place as soon as the month of June begins; Know the rising prices

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Changes From 1st June 2023 | मे महिना संपून आता नवीन महिना सुरु होत आहे. येत्या जून (June) महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. जून महिन्यात काही खर्च वाढणार असून त्याने खर्चाचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे जून महिन्यात (Changes From 1st June 2023) कोणकोणते बदल होणार आहेत हे जाणून घेऊया.

एलपीजी गॅस (LPG Gas) दरात वाढ होण्याची शक्यता – दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी इंधन कंपन्याकडून (Government Fuel Companies) एलपीजीच्या किंमती (LPG Prices) ठरवल्या जातात. एलपीजी गॅसच्या देखील किंमती महिन्याच्या एक तारखेला निश्चित होतात. मागील एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG Price) सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. मात्र, 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला गेला नव्हता. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात एलपीजी गॅस दरात कितीने वाढ होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

सीएनजी-पीएनजीच्या दरात CNG-PNG Rate बदल – एलपीजी गॅस प्रमाणे दर महिन्याला सीएनजी-पीएनजी गॅसच्या किंमतीचा चढ-उतार होत असतो. एप्रिल महिन्यात मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) सीएनजी-पीएनजी दरात बदल करण्यात आला होता. मात्र मे महिन्यात बदल न होता, एप्रिलचे दर कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे जून महिन्यात सीएनजी-पीएनजी दरात कोणता बदल केला जाणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. (Changes From 1st June 2023)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

इ-बाईक्स महागणार (E-Bikes Price Hike) – देशात सध्या इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
मात्र आता 1 जूनपासून ह्या इलेक्ट्रिक दुचाकीची खरेदी महागात पडणार आहे.
एक जूननंतर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर जास्तीची किंमत मोजावी लागणार आहे. 21 मे रोजी याबात एक अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यानुसार, अवजड उद्योग मंत्रालयातर्फे (Ministry of Heavy Industries) FAME-II अनुदानाच्या (Grant) रक्कमेत घट करण्यात आली आहे. अनुदानात 10,000 रुपये प्रति KWH इतकी घट करण्यात आली आहे, पूर्वी ही रक्कम 15,000 रुपये प्रति किलोवॉट होती. यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीत 25,000 ते 35,000 रुपयांनी वाढ होऊ शकते.

रिझर्व्ह बँकेची मोहीम (RBI)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक जूनपासून देशभरातील बँकेमध्ये असणाऱ्या बेवारस (Destitute) दावा न
केलेल्या रक्कमेचा निपटारा (Settlement) करण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे.
या मोहिमेचे नाव ‘100 दिवस 100 पेमेंट्स’ (100 Days 100 Payments) असे ठेवण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना कळवले आहे. या मोहिमेअंतर्गत 100 दिवसांत वारस नसलेल्या,
कोणताही दावा नसलेल्या बँक खात्यातील रक्कमेचा बंदोबस्त केला जाणार आहे.

Web Title : Changes From 1st June 2023 | These changes will take place as soon as the month of
June begins; Know the rising prices

Related Posts