IMPIMP

Chhagan Bhujbal | शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला? ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम, म्हणाले…

by nagesh
Chagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on rahul gandhi savarkar statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दोन दिवसांपूर्वी विद्येची देवता
सरस्वतीवर (Saraswati) केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना
तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवले नाही, त्यांची पूजा कशाला करायची? असे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले होते. त्या
विधानावर आता स्वत: भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचे राजकीयकरण का केले जाते हे मला कळत नाही, असे म्हणाले. तसेच मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मत मांडण्याचा मला अधिकार आहे

 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, हे वक्तव्य मी ज्या दिवशी बोललो, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा (Satyashodhak Samaj) आदर करण्याचा कार्यक्रम होता. मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाविरोधात बोललो असतो तर ती वेगळी गोष्ट आहे. मी हेच बोललो होतो की, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले, त्यांचा आदर करायला हवा. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

 

मी देखील हिंदूच आहे

 

आपल्याला सरस्वतीने काही शिकवले नाही, त्यामुळे सरस्वती पूजनाचा प्रश्न येतोच कुठे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे (Annasaheb Karve) यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. कोणाचे फोटो काढा किंवा लावा, असं मी म्हणालो नव्हतो. मात्र माझ्या वक्तव्याचा राजकीय मुद्दा बनवला जातो आहे. मी देखील हिंदूच आहे, हिंदुंसाठी बरीच कामे केली आहेत. देवीच्या दर्शनाला देखील जातो. पण देवीऐवजी महापुरुषांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे भूजबळ यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या भूमिकेवर मी ठाम

 

सरस्वतीची आपण पूजा करतो त्यांनी काय आपल्याला शिकवले नाही त्यांनी कुठे शाळा काढली.
सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली त्यामुळे मी सरस्वती ऐवजी त्यांची पूजा करा असं म्हणालो.
मी कुठेही सरस्वती देवीचा फोटो काढा असे म्हणालो नाही.
मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे भूजबळ यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Chhagan Bhujbal | why saraswatis photo in school chhagan bhujbals explanation on that statement

 

हे देखील वाचा :

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिरुरमध्ये काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंचा आढळराव पाटलांना टोला

CM Eknath Shinde | अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर आणखी एका नेत्याचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

 

Related Posts