IMPIMP

Chitra Wagh | कावळा काव काव करत राहीला पण कोकीळेला न्याय मिळाला!, न्यायालयाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं

by nagesh
Chitra Wagh | BJP leader chitra wagh reaction on supreme court verdict on maharashtra political crisis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज जाहिर केला असून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) वाचले आहे. सगळं बेकायदेशीर असलं तरी सरकार कायदेशीर असल्याचे निकालातून समोर आले आहे. असं असताना भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत विरोधकांना डिवचलं आहे. ‘कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला’, असं म्हणत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
कोकिळेला न्याय मिळाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि
सगळ्या विरोधकांना डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की
कावळा कोण आणि कोकिळा कोण हे निकालातून कळेल. आता हे सिद्ध झालंच, कावळा कोण आणि कोकिळा कोण? कावळा काव काव करत राहिला पण कोकिळेला न्याय मिळाला. लोकशाहीचा हा विजय. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार, असं म्हणत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केलं आहे.

 

 

ही लोकशाहीची हत्या नाही का ?

पंतप्रधान मोदीजींचा (PM Narendra Modi) फोटो लावून तुमचे आमदार निवडून आले आणि नंतर काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीच्या (NCP) मांडीला मांडी लावून बसले…तेंव्हा उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला. ही लोकशाहीची हत्या नाही का? बरं सुप्रीम कोर्टानं स्पष्टच केलंय, तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सरकार पडलं. आता पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री करता येणार नाही. म्हणजे चूक तुमचीच, शस्त्र तुमच्या हातात…हत्या तुम्हीच केली आणि आता लोकशाहीच्या नावाने गळे काढताय. केवढा हा निर्लज्जपणा, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Chitra Wagh | BJP leader chitra wagh reaction on supreme court verdict on maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | कोर्टाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड – उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

Pune Crime News | सुट्टे पैसे मागून डॉक्टरांच्या नावाने 2 लाखांची फसवणूक; एका पाठोपाठ 2 गुन्हे दाखल

Prithviraj Chavan | ‘…नैतिकतेच्या आधारावर सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अन्’, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

 

Related Posts