IMPIMP

Maharashtra Politics News | अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद?, शरद पवारांच्या भूमिकेवर नाना पटोले म्हणाले -‘…तर त्यांची भूमिका त्यांना लखलाभ’

by nagesh
 Maharashtra Politics News | nana patole reaction on sharad pawar statement about gautam adani case hindenburg research

गोंदिया : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | अदानी प्रकरणावरुन (Adani Case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंडेनबर्ग संस्थेने (Hindenburg
Institute) जारी केलेल्या अहवालावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यासह अदानी समूहावर जोरदार (Maharashtra Politics News) हल्लाबोल
केला आहे. यातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावर बोलताना हिंडेनबर्ग अहवालात अदानी यांना
लक्ष्य करण्यात आलं असल्याचे म्हटले होते. आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले होते शरद पवार?

हिंडेनबर्ग कंपनीचं नाव कधी ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? हेही माहीत नव्हतं. अशा विषयांवर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात आदानींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होते. त्यांच्या या वक्व्यानंतर राज्याच्या राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

 

काय म्हणाले नाना पटोले?

गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, देशातील जनतेचे LIC व SBI मध्ये असलेले पैसे आणि कर्मचाऱ्यांचा PF खोट्या कंपन्या दाखवून अदानी समूहाने (Adani Group) लुटला आहे. त्याबद्दलचं सगळं चित्र जनतेसमोर आले आहे. हे सगळं असताना संयुक्त संसदीय समिती (JPC) कडून तपास करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय अडचण आहे? मोदी व अदानी यांचे संबंध काय आहेत? हे प्रश्न सतत काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेल्या पक्षांनी लोकसभेत विचारले आहेत. त्यामुळे ‘चोर के दाढी में तिनका’ असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

 

तर त्यांची भूमिका त्यांना लखलाभ

शरद पवार यांनी जी काही भूमिका मांडली, ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर त्यांना ती लखलाभ. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान अदानी प्रकरणावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे ‘दाल में कुछ काला है’ असं दिसतंय किंवा पूर्ण डाळच काळी असेल. अदानी आणि मोदींच्या संदर्भात राहुल गांधी यांनी संसदेत जी भूमिका मांडली, त्यानुसार काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे नाना पटोले म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | nana patole reaction on sharad pawar statement about gautam adani case hindenburg research

 

हे देखील वाचा :

Pune PMC – Uruli Devachi – Fursungi | गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका किंवा महापालिका निर्माण करण्याची मागणी ‘राजकियच’ !

CM Eknath Shinde | अयोध्येला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा, म्हणाले-‘मला जुन्या विषयांवर बोलायला…’ (व्हिडिओ)

Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं

 

Related Posts