IMPIMP

CM Eknath Shinde | शिवसेना भवनाजवळच एकनाथ शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय

by nagesh
Eknath Shinde | Uddhav Thackeray's mistake has been corrected by Chief Minister Eknath Shinde - Jayakumar Gore

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Eknath Shinde | खरी शिवसेना आम्हीच, धनुष्यबाण आमचंच, दसरा मेळावा आम्हीच घेणार, असे दावे करून शिवसेनाला (Shivsena) अडचणीत आण्याचे प्रयत्न सातत्याने शिंदे गटाकडून सुरू आहेत. खरी शिवसेना कुणाची हा वाद सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दादरच्या शिवसेना भवनाजवळ (Shivsena Bhavan) शिंदे गटाचे (Shinde Group) मध्यवर्ती कार्यालय उघडणार आहे. यासाठी जागा सुद्धा पक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. (CM Eknath Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुरूवातीला शिवसेना भवनावरच दावा करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता. परंतु, तो विचार सोडून देऊन आता शिंदे गटाने शिवसेना भवनाच्या शेजारी जागेचा शोध सुरू केला होता. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दादरमध्ये कार्यालयासाठी दोन-तीन जागांची पाहणी केली. त्यातील एक जागा निश्चित झाल्याचे समजते. (CM Eknath Shinde)

 

शिवसेना भवनापासून काही अंतरावरच वास्तू सेंट्रल नावाच्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर शिंदे गटाचे कार्यालय सुरू होऊ शकते. शिवसेना भवन आणि या इमारतीत 500 मीटर अंतर आहे. या इमारतीत 2 मजले भाड्याने घेण्यात येतील. या इमारतीच्याजवळ कोहिनूर मिलची जागा आणि शिवसेना भवन आहे. मध्यवर्ती कार्यालयात राज्यभरातून शिंदे गटाचे पदाधिकारी याठिकाणी येऊ शकतील. शिंदे गटाच्या बैठका या कार्यालयात होतील. दादर, ठाणे भागात शिंदे गटाची मध्यवर्ती कार्यालये उघडली जाणार आहेत.

 

मुंबईत एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व फारसे नाही.
यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कार्यालय उघडण्याची घाई शिंदे गटाकडून सुरू आहे.
यासाठी शिंदे यांनी मुंबईतील शिवसेनेचे बंडखोर नेते प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, दिलीप लांडे, सदा सरवणकर, मंगेश
कुडाळकर आणि खासदार राहुल शेवाळे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिंदे गट आणि भाजपा
एकत्रितपणे मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- CM Eknath Shinde | central office of cm eknath shinde group near shivsena bhavan read what will be the address

 

हे देखील वाचा :

Diabetes Diet | कच्च्या भाज्या खाऊन दूर होऊ शकते का डायबिटीजची समस्या, जाणून घ्या किती परिणामकारक आहे ‘हे’ खाणे

Yakub Memon Grave | याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद

Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Related Posts