IMPIMP

Yakub Memon Grave | याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद

by nagesh
Ashish Shelar | Those who did not wipe the tears of farmers in two and a half years, are now touring, Ashish Shelar's attack on Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Yakub Memon Grave | 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननच्या मुंबईतील बडा कब्रिस्तान येथील कबरीवर मार्बल आणि लायटींग लावण्यात आली आहे. कोविड काळात हे सुशोभिकरण झाले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपात वादंग सुरू झाला आहे. यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. (Yakub Memon Grave)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून शिवसेनेवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली स्पष्ट होते. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणार्‍यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे. (Yakub Memon Grave)

 

बावनकुळे म्हणाले, याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचे स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे.

 

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले की, पाकिस्तानच्या मदतीने दाऊदने भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातील प्रमुख आरोपी याकूब मेननला फाशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कब्रस्तानची जबाबदारी महापालिकेकडे असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसाच्या कबरीचे सुशोभिकरण सुरू आहे. पेग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम सुरू करून पेग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी त्याचे नेतृत्व करावे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शेलार पुढे म्हणाले, याकूब मेननला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसने मांडलेली भूमिका होती.
त्यावेळी केंद्रात कोणाचे सरकार होते? गृहमंत्री कोण होते? याचे उत्तर काँग्रेसने पहिले द्यावे.
सुप्रीम कोर्टात काँग्रेसने काय भूमिका मांडली होती? याकूब मेननला जिवंत ठेवा अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केली होती.
सत्तेत असताना शिवसेना दाऊदची समर्थक होती हे आम्ही पाहिले. शिवसेना आता दाऊदची प्रचारक झाली आहे.

 

Web Title :- Yakub Memon Grave | controversy over beautification of terrorist yakub memon grave bjp criticized shiv sena uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

Pune Ganesh Visarjan Procession | बाप्पाच्या विसर्जनासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल, जाणून घ्या कशी असेल वाहतूक आणि पार्किंगची व्यवस्था

Pune Purandar Airport | विमानतळ ग्रस्तांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; जमिनी न देण्यावर ठाम, ठरावही मंजूर

 

Related Posts