IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘दीड महिन्यांपूर्वी 50 थर लावून मोठी राजकीय दहीहंडी फोडली’ (व्हिडिओ)

by nagesh
CM Eknath Shinde | chief minister eknath shinde slams uddhav thackeray said big dahihandi was broken a month and a half ago with 50 mla

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना नाव न घेता लगावला. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन, असेही आवाहन त्यांनी केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाका (Tembhi Naka) दहीहंडी उत्सवात (Dahi Handi-2022) जोरदार फटकेबाजी केली.
स्टेजवर येताच गोविंदा जोरात आहे ना ? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली.
ते पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा (Insurance) पण दिला, सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होती.
ती मागणी मान्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र जसा शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा आहे. तसा गोविंदाचा देखील आहे.
अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो-कबड्डी (Pro-Kabaddi) प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो-गोविंदा (Pro-Govinda) होईल आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आज मानाच्या दहीहंडीला उपस्थित राहताना मला आणखी एका गोष्टीचा खूप आनंद होत आहे.
ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न होतं.
दिघेंच्या भगिनी अरुणाताई यांनी माझ्याजवळ ही इच्छा बोलून दाखवली होती.
ते आज खरं झालं आहे म्हणजे दिघे साहेबांची काय दूरदृष्टी होती हे यातून दिसून येतं, असं ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टेंभी नाका म्हणजे गोविंदाची पंढरी. महाराष्ट्राचा हा इतिहास, परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं.
आज प्रत्येक गोविंदा पथक टेंभी नाक्याच्या दहीहंडीला सलामी देऊन दहीहंडीला सुरुवात करतो.
आनंद दिघेंनी दहीहंडीचा उत्सव राज्यभर नेला.
त्याच गोविंदांसाठी राज्य सरकारनं तीन महत्त्वाचे निर्णय घेतले.
दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी, 10 लाखाचा विमा आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचं काम आम्ही केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title : –  CM Eknath Shinde | chief minister eknath shinde slams uddhav thackeray said big dahihandi was broken a month and a half ago with 50 mla

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘धर्मवीर आनंद दिघेंची ती इच्छा आज पूर्ण झाली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा (व्हिडिओ)

Gopichand Padalkar | ‘देवेंद्र फडणवीसांनी बहुजनांसाठी केलेले काम कुणी झाकू शकत नाही’ – गोपीचंद पडळकर

Sanjay Raut | ‘माझ्यावरील आरोप निराधार आणि खोटे’; ‘त्या’ प्रकरणावरील सुनावणी दरम्यान संजय राऊतांचा दावा

 

Related Posts