IMPIMP

CM Eknath Shinde On Bhagat Singh Koshyari | राज्यपालांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मराठी माणसाच्या मेहनतीवरच…’

by nagesh
CM Eknath Shinde On Bhagat Singh Koshyari | cm eknath shinde first reaction on controversial statement of bhagat singh koshyari on mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde On Bhagat Singh Koshyari | राज्यपालांचे विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, राज्यपाल हे संवैधानिक पद असून ते राज्याचे एक प्रमुख व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: मुंबईतील मराठी माणसाच्या योगदानाची कुणालाही अवहेलना किंवा अवमान करता येणार नाही. (CM Eknath Shinde On Bhagat Singh Koshyari)

 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, आमची स्पष्ट भूमिका आहे. मराठी माणसाचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही.
मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे.
या मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. इतर समाजाचे लोकही व्यवसाय, व्यापार करतात.
परंतु, मुंबईत जे काही सामर्थ्य आहे, महत्त्व आहे त्यामुळेच हे होते. याचे श्रेय इतर कुणालाही घेता येणार नाही.
मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या मागे आहोत.

 

शिंदे पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांनी मराठी माणसाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठीच शिवसेनेची स्थापना केली.
त्यामुळे मुंबईवर अनेक प्रसंग आले, मुंबईने अनेक संकटे पाहिली.
मात्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम मुंबईच्या पाठिशी उभे राहिले.
कितीही संकटे आले तरी मुंबई थांबत नाही. मुंबई 24 तास सुरू असते. मुंबई कोट्यावधी लोकांना रोजगार देते.
त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मुंबईच्या माध्यमातून सुटत असतो, असे शिंदे म्हणाले.

 

मुंबईत एका नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की,
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.
मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : –  CM Eknath Shinde On Bhagat Singh Koshyari | cm eknath shinde first reaction on controversial statement of bhagat singh koshyari on mumbai

 

हे देखील वाचा :

Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर

Shivsena Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज’ – उद्धव ठाकरे

Health Tips | सकाळी झोपेतून उठताच मोबाईल चेक करण्याची सवय धोकादायक! होऊ शकते ‘हे’ 3 प्रकारचे नुकसान, अशी करा दिवसाची सुरूवात

 

Related Posts