IMPIMP

CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

by nagesh
CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat | With the death of MP Girish Bapat, comprehensive, compassionate leadership is lost; Tribute to Chief Minister Eknath Shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat | भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ
नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त
केला आहे. (CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. (CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat)

 

सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे.
महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.
असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde On Pune BJP MP Girish Bapat | With the death of MP Girish Bapat, comprehensive, compassionate leadership is lost; Tribute to Chief Minister Eknath Shinde

 

हे देखील वाचा :

NCP Ajit Pawar On Pune BJP MP Girish Bapat | पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली

SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : अमेरिका आणि चीनच्या पलीकडे जात भारताने आपला स्वतंत्र मार्ग निवडावा; चीनविषयक धोरणात्मक संवाद परिषदेत तज्ज्ञांचा सुर

Buldhana Crime News | गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकल्याने फास लागून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Crime News | लष्कराच्या परीक्षेत बनावट उमेदवाराला बसविणार्‍यास अटक

Pune MP Girish Bapat In ICU | खासदार गिरीश बापट अत्यावस्थ, दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या ICU मध्ये उपचार सुरू

 

Related Posts