IMPIMP

CM Uddhav Thackeray | जय महाराष्ट्र ! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव

by nagesh
CM Uddhav Thackeray | Chief Minister naveen patnaik is most performing cm uddhav thacekray also in the list

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | भारतातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. मागील दोन महिन्यापासून आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांत उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेतला नाही. पण उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कायम असल्याचं कळते. इंडिया टुडे माध्यम समूहाच्या सर्वेक्षणावरुन उद्धव ठाकरे 4 थ्या क्रमांकावर आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

इंडिया टुडेच्या सर्वेक्षणानूसार, प्रत्येक राज्यातील नागरीकांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी आहे याबाबत सवाल केले गेले, 43 टक्क्यांहून जादा मतं मिळालेल्या 9 मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली गेली आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या लिस्टमध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) प्रथम क्रमांकावर आहेत. पटनायक यांच्या कामावर 71.1 टक्के नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच दुस-या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आहेत. 69.9 टक्के जनता त्याच्या कामावर समाधानी आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) हे तिस-या क्रमांकावर आहे. 67.5 टक्के नागरीकांनी त्याच्या कामावर समाधान व्यक्त केले आहेत. नंतर चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत. 61.8 टक्के नागरीकांनी त्याच्या कार्यावर समाधान व्यक्त केले आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री लिस्ट –

1. मुख्यमंत्री नवीन पटनायक (ओडिसा)

2. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)

3. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (तमिळनाडू)

4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)

5. मुख्यमंत्री पिनाराई विजयन (केरळ)

6. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (दिल्ली)

7. मुख्यमंत्री हेमंत विस्व सर्मा (आसाम)

8. मुख्यमंत्री भूपेश बघेल (छत्तीसगड)

9. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (राजस्थान)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- CM Uddhav Thackeray | Chief Minister naveen patnaik is most performing cm uddhav thacekray also in the list

हे देखील वाचा :

SSC HSC Exam 2022 | दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर

Remo D’Souza | रेमो डिसूझाच्या कुटुंबातील सदस्याची आत्महत्या, संपूर्ण कुटुंबला मोठा धक्का

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts