IMPIMP

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले – ‘शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस’

by nagesh
Corporator Pramod Bhangire | Success after many years of struggle! Drinking water will be available 24 hours in Handewadi, Kalepadal area

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Pramod Bhangire | शिवसेना नगरसेवकांची (Shiv Sena corporator) विकासकामे कधी पण इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस असतात असे माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी सांगितले. नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

प्रभाग क्र 26 मधील जय भवानी चौक (Jai Bhavani Chowk) येथे नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. आजू बाजूच्या सोसायटी मधील नागरिक या घाणीमुळे त्रस्त झाले होते. हे लक्षात येताच नाना भानगिरे यांनी 8 दिवसामध्ये पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) निधीची वाट न पाहता जय भवानी चौकाचे सुशोभीकरण केले. याचे उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरसेवक प्रमोद भानगिरे (Corporator Pramod Bhangire) यांनी आपल्या स्वखर्चाने प्रभागात नागरिक आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी CCTV कॅमेरे बसवले आहेत. त्याचे लोकार्पण यावेळी आढळराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

 

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, इतर नगरसेवकांपेक्षा शिवसेना नगरसेवकांची विकासकामे (Development work) कधी पण इतर नगरसेवकांपेक्षा सरस असतात. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात नावजलेला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) परवानगी मिळाल्या बद्दल आढळराव पाटील यांचे आभार मानून आनंद उत्सव साजरा केला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

या वेळी शिवसेना जिल्ह्याप्रमुख विजय देशमुख (Vijay Deshmukh) व नगरसेविका प्राची आल्हाट (Prachi Alhat)
यांचा जन्म दिवस साजरा केला. या वेळी समीर तुपे, राजेंद्र बाबर, काटकर, तानाजी लोणकर, बाळासाहेब भानगिरे,
अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title :- Corporator Pramod Bhangire | Inauguration of development work in Ward 26 by Pramod Bhangire at his own expense; Shivajirao Adhalrao Patil said – ‘Development work of Shiv Sena corporators is better than other corporators’

 

हे देखील वाचा :

Prashant Jagtap | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची; प्रशांत जगताप यांची टीका

Maharashtra Police-CID | ICJS मधील ‘पोलीस सर्च’ वर्गवारीत देशपातळीवर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक; CID मधील PSI अर्चना कदम, पोलिस अंमलदार संदीप शिंदे, प्रियंका शितोळे यांचा गौरव

RTE Admission | आरटीई प्रवेशाच्या 24 हजारांहून अधिक जागा रिक्त, पुण्यात 13 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

 

Related Posts