IMPIMP

Deepali Sayed On BJP | ‘एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही’; दिपाली सय्यद यांचा टोला

by nagesh
Deepali Sayed | shivsena thackeray faction deepali sayyed on joining eknath shinde faction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Deepali Sayed On BJP | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) महाराष्ट्रात सहाव्या जागेवर भाजपाने (BJP) विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला एक मोठा धक्का बसला आहे. यानंतर भाजप नेत्याकडून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला जात आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप शिवसेना नेते करताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“एका राज्यसभेने मुख्यमंत्री होता येत नाही, अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही,” असा टोला शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. “एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही. एका राज्यसभेने कोल्हापूरची पोटनिवडणुक जिंकता येत नाही. 106 काय 130 असू द्या, पण अनाजीपंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही.
जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही,” असं ट्वीट करत त्यांनी टोला लगावला. (Deepali Sayed On BJP)

 

https://twitter.com/deepalisayed/status/1535538188974014464

 

राज्यसभा निवडणुकीचा निकाल आज पहाटे पार पडला.
यामध्ये भाजपचे तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.
भाजपाचे पियूष गोयल, अनिल बोंडे, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत हे पहिल्या पसंतीची मतं मिळवून विजयी झाले.
तर भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात अटीतटीची लढत झाली.
त्यात दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आवश्यक तो कोटा मिळवून धनंजय महाडिक विजयी झाले.

 

Web Title :- Deepali Sayed On BJP | rajya sabha election result one rajya sabha cannot be chief minister maharashtra will not accept devendra fadanvis says shivsena leader deepali sayed

 

हे देखील वाचा :

The Poona Gujarati Kelvani Mandal | दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ‘हरिभाई देसाई विद्याधाम’ या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन

Pooja Chavan Suicide Case | ‘पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चीट द्या’, बंजारा महंतांची पुणे पोलिसांकडे मागणी

MP Sujay Vikhe-Patil | “शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीनेच केला; मुख्यमंत्र्यांनी षडयंत्र ओळखावं” – खासदार सुजय विखे-पाटील

 

Related Posts