IMPIMP

Devendra Fadnavis | ‘…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती’; राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | cm eknath shinde and dycm devendra fadnavis pc on supreme court verdict maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल (Maharashtra Political Crisis)
देताना आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualified) निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. तसेच शिंदे सरकारला (Shinde Government) मोठा दिलासा दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे. यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निकालातील महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी न्यायालयाच्या निकालानंतर राजीनाम्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण दिले. मी नैतिकतेपोटी राजीनामा दिला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या प्रक्रियेवरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, मी त्यांची पत्रकार परिषद बघितली, नॉर्मली मी बघत नाही. मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा (Resignation) दिला असं ते म्हणतात. भाजपसोबत (BJP) निवडून आलात आणि काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) गेलात तेव्हा ही नैतिकता कोणत्या डब्यात गेली होती? असा सवाल फडणवीस यांनी ठाकरेंना केला आहे.

 

 

नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये. कारण खुर्ची करता तुम्ही विचार सोडला. शिंदेंनी विचाराकरता खुर्ची सोडली. ते सरकारमधून विरोधात आले कारण आम्ही तेव्हा विरोधात होतो. तुमच्याकडे नंबर नाही ते तुमच्या लक्षात आलं होतं, या लाजेपोटी, भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिला. त्याला नैतिकतेचा मुलामा लावू नका. एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

मविआच्या मनसुब्यावर पाणी फेरत ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, हे कोर्टाने सांगितले आहे.
डिसक्वालिफिकेशनच्या पिटिशनचा अधिकार हा स्पीकरचा आहे, त्यामुळे स्पीकर यावर सुनावणी घेतील हे आता
स्पष्ट झाले आहे. कोणतीही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन नाही. त्यामुळे कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
ज्यांच्यावर डिसक्वालिफिकेशन पेंडिंग आहे त्यांना पूर्ण अधिकार आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Devendra Fadnavis | cm eknath shinde and dycm devendra fadnavis pc on supreme court verdict maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; नाशिक जिमखाना संघाचा दुहेरी विजय !!

BARTI Pune | बार्टी संस्था ‘आयएसओ’ ने सन्मानित

Ganesh Nanasaheb Gaikwad | नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड याची अमरावती कारागृहात रवानगी

 

Related Posts