IMPIMP

Ganesh Nanasaheb Gaikwad | नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड याची अमरावती कारागृहात रवानगी

by nagesh
Ganesh Nanasaheb Gaikwad | Nanasaheb Gaikwad and his son Ganesh Gaikwad sent to Amravati Jail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- दुहेरी मोक्क्यातील MCOCA (Mokka Action) आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड (Nanasaheb Shankarrao Gaikwad) आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड (Ganesh Nanasaheb Gaikwad) यांची येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) अमरावती मध्यवर्ती कारागृहात (Amravati Central Jail ) रवानगी करण्यात आली आहे. येरवडा कारागृहात असताना कैदी नानासाहेब गायकवाड याने फिर्यादीवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न केला होता. तर गणेश गायकवाड याने तर चक्क मोबाईलचा वापर करत फिर्यादीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तसेच नानासाहेबने त्याचा भावाला भेटण्यासाठी कारागृह प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रकार केला होता. तसेच महिला तुरुंग अधिका-यासमोर अर्वाच्च भाषेत आरडा-ओरड करत गैरवर्तन करत कारागृह शिस्त व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गैरवर्तनाचा तसा अहवालच जेल प्रशासनाने न्यायालयात सादर केला होता. त्यावर न्यायालयाने (Shivaji Nagar Court) परवानगी देत त्यांना कोणत्याही न्यायालयात वर्ग करण्यास परवानगी देण्यात आली. (Ganesh Nanasaheb Gaikwad)

 

महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित असलेल्या येरवडा कारागृहांत नुकतीच एका कैद्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. याच कैद्याने पूर्वी नानासाहेब गायकवाडवर हल्ला केला होता. त्याआधी देखील कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. त्या कैद्यांची भांडणं सोडवायला गेलेल्या हवालदारालादेखील मारहाण झाल्याने एकच खळबळ माजली होती. महाराष्ट्रसह देशातील अनेक ठिकाणांचे कुख्यात गुन्हेगार येथे शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाकडून नेहमीच खबरदारी घेण्यात येत असते. मात्र कैद्यांची वर्तनुक दिवसेंदिवस बिघडत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Ganesh Nanasaheb Gaikwad)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ सह त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या
कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे,
बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक (Cheating Case) करणे, डांबून ठेवणे,
जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी
(Money Lenders In Pune) करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय (Pune City Police)
कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

 

 

Web Title :-  Ganesh Nanasaheb Gaikwad | Nanasaheb Gaikwad and his son Ganesh Gaikwad sent to Amravati Jail

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | कावळा काव काव करत राहीला पण कोकीळेला न्याय मिळाला!, न्यायालयाच्या निकालानंतर चित्रा वाघ यांनी विरोधकांना डिवचलं

Uddhav Thackeray | कोर्टाचा निकाल म्हणजे सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्या-नागड्या राजकारणाची चिरफाड – उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

Pune Crime News | सुट्टे पैसे मागून डॉक्टरांच्या नावाने 2 लाखांची फसवणूक; एका पाठोपाठ 2 गुन्हे दाखल

 

Related Posts