IMPIMP

Suryakumar Yadav | ‘सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!’ ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

by nagesh
 Suryakumar Yadav | australia shane watson comment on indian batter t20 world cup 2022 ind vs zim ipl india

सरकारसत्ता ऑनलाईन  –  Suryakumar Yadav | टी-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंडबरोबर (England) सामना होणार आहे. गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी ॲडलेडमध्ये (Adelaide) दोन्ही संघ आमने-सामने भिडणार आहेत. या वर्ल्डकपमध्ये भारताच्या सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादवची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. या खेळाडूचे ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी फलंदाज शेन वॉटसनने (Shane Watson) कौतुक केले आहे. सूर्यकुमार यादव जे करत आहे ते फार कमी लोक करू शकतात असे वक्तव्य त्याने केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच्या या खेळीचे शेन वॉटसनने सूर्यकुमारचे कौतुक केले आहे. सूर्याला फलंदाजी करताना पाहणं जबरदस्त आहे. आपण त्याला आयपीएलमध्येही (IPL) फॉलो करतो, असेदेखील शेन वॉटसन म्हणाला आहे. “आयपीएलमध्ये जे केलं ते त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणं सोपं नाही. ऑस्ट्रेलियासारख्या देशात येऊन धावा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. बॉलिंग ओळखणं आणि त्याच्यानुसार फटकेबाजी करणं मजेशीर आहे. फिल्डर्सनुसार फटकेबाजी करणं, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या मैदानांमध्ये धावा करणं सोपी गोष्टी नाही,” असेदेखील शेन वॉटसन म्हणाला.

 

सूर्याने रचला विक्रम
ICC T20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव सध्या प्रथम क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात 25
चेंडूत 61 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 4 चौकारचा समावेश आहे. यासह त्याने 2022 मध्ये टी-20
क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा
करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत T20 विश्वचषक 2022 च्या 5 डावात 225 धावा केल्या आहेत.

 

 

कमी कालावधीत मिळवली लोकप्रियता
सूर्यकुमार यादव गेल्या एका वर्षात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा सर्वात विश्वासार्ह फलंदाज
ठरला आहे. त्याने आपल्या खेळीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
त्याने आतापर्यंत भारतासाठी T20 क्रिकेटच्या 38 सामन्यांमध्ये 1209 धावा केल्या आहेत.
यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. सूर्यकुमार जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा तो चौफेर फटकेबाजी करत असतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Suryakumar Yadav | australia shane watson comment on indian batter t20 world cup 2022 ind vs zim ipl india

 

 

हे देखील वाचा :

Katrina Kaif | कतरिना कैफने तिच्या लग्नामध्ये झालेल्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा; म्हणाली…

Cursed Movie | हॉलीवूडचा ‘हा’ चित्रपट आहे शापित ; स्क्रिप्ट तयार असून देखील चित्रपट कधीच बनला नाही

Har Har Mahadev | ठाण्यात घडलेला प्रकार लांच्छनास्पद, महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागा…; ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजित देशपांडेंची स्पष्ट भूमिका

 

 

Related Posts