IMPIMP

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

विश्वास पाटील, संतोष वरधावे आणि किशोर कदम यांना लेखनाचे पुरस्कार जाहीर

by nagesh
Punyabhushan Award | Punya Bhushan Foundation Best Diwali Issue Award MNS Raj Thackeray Saturday In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Punyabhushan Award | पुण्यभूषण फाउंडेशनच्या (Punyabhushan Foundation) वतीने दर वर्षी देण्यात येणारा सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार (Diwali Ank Award) यंदा ‘दीपावली’ या दिवाळी अंकाला, तर दिवाळी अंकांमधील सर्वोत्तम लेखनाचे पुरस्कार यंदा विश्वास पाटील (Vishwas Patil), संतोष वरधावे (Santosh Wardhave) आणि किशोर कदम (Kishor Kadam) यांना देण्यात येणार आहे. शनिवार दि.26) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, असे पुण्यभूषण फाऊंडेशनचे (Punyabhushan Award) अध्यक्ष डॉ. सतीश देसाई (Dr. Satish Desai) यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

यावेळी पुण्यभूषण फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष संजय भास्कर जोशी (Sanjay Bhaskar Joshi), प्रमुख कार्यवाह महेंद्र मुंजाळ (Mahendra Munjal), सहकार्यवाह वृषाली दाभोळकर (Vrushali Dabholkar), वैशाली गाडगीळ (Vaishali Gadgil), संतोष पाटील (Santosh Patil) आणि पुण्यभूषण दिवाळी अंक पुरस्कार समितीचे सदस्य उपस्थित होते. (Punyabhushan Award)

 

यावेळी बोलताना डॉ. सतीश देसाई म्हणाले की, दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा दैदिप्यमान स्वरूपप्राप्त व्हावे आणि उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन मिळावे याच हेतूने मागील वर्षापासून पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दाजीकाका गाडगीळ (Dajikaka Gadgil) यांचे स्मरणार्थ पी. एन. जी. (P.N.G.) तर्फे पुरस्कृत केला आहे.

 

यंदा ‘दीपावली’ या दिवाळी अंकाची निवड एक लाख रुपयांच्या ‘सर्वोत्तम दिवाळी पुरस्कार’ आणि सुवर्णमुद्रांकित सन्मानपत्रासाठी करण्यात आली आहे. 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या शेकडो दिवाळी अंकातून दहा वाचन स्वयंसेवकांनी प्राथमिक गुणांकन करून अंक निवडले आणि त्यानंतर ज्येष्ठ वाचक, लेखक, विचारवंत हरी नरके (Hari Narke), नीरजा, संजय भास्कर जोशी, रेखा साने (Rekha Sane) आणि नितीन वैद्य (Nitin Vaidya) यांच्या निवड समितीने (Selection Committee) या पुरस्कारासाठी ‘दीपावली’ या दिवाळी अंकाची निवड केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

त्याच बरोबर दर वर्षी दिवाळी अंकातील कथात्म गद्य, ललित व वैचारिक गद्य आणि काव्य या तीन प्रकारातील उत्तम साहित्यास प्रत्येकी 11 हजार रुपये आणि मानपत्र असा पुरस्कार देण्यात येतो.
न्या. नरेंद्र चपळगावकर (Justice. Narendra Chapalgaonkar), डॉ. सदानंद मोरे (Dr. Sadanand More), रामदास भटकळ (Ramdas Bhatkal), दिलीप माजगावकर (Dilip Mazgaonkar) आणि डॉ. अरुणा ढेरे (Dr. Aruna Dhere) हे या उपक्रमाला मार्गदर्शन करतात.
या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.
लेखकांना देण्यात येणारे पुरस्कार मराठीतील मान्यवर प्रकाशकांनी प्रायोजित केले आहेत.
त्यानुसार राजहंस प्रकाशन पुरस्कृत ‘सर्वोत्तम ललित आणि वैचारिक लेखन’ पुरस्कार विश्वास पाटील यांना अक्षरधारा दिवाळी अंकातील ‘मशीनगन्स आणि मतपेट्या’ या लेखास, रोहन प्रकाशन पुरस्कृत ‘सर्वोत्तम कथा’ पुरस्कार हंस दिवाळी अंकातील ‘नांगी’ या कथेसाठी संतोष वरधावे यांना, तर संस्कृती प्रकाशन पुरस्कृत ‘सर्वोत्तम कविता’ पुरस्कार एबीपी माझा दिवाळी अंकातील ‘उत्सव’ या कवितेसाठी किशोर कदम (सौमित्र) यांना देण्यात येणार आहे.

 

या पुरस्कारांचा वितरण सोहळा शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पुण्यातील एस .एम. जोशी सभागृहात (SM Joshi Hall) संपन्न होणार आहे आणि त्यात राज ठाकरे यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. मोरे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणारआहे.
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून होणाऱ्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Punyabhushan Award | Punya Bhushan Foundation Best Diwali Issue Award MNS Raj Thackeray Saturday In Pune

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘ती’ पत्रं ठेवली समोर

Pune Crime | पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीवर कोयत्याने सपासप वार

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका : बहुचर्चित मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना मान्यता

 

Related Posts