IMPIMP

Devendra Fadnavis | ‘दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करण्यावर आक्षेप नसावा, पण…’, देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis big statement on inter religious marriage love jihad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपच्या (BJP) नेत्यांकडून लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधातील कायद्याची मागणी होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील बेपत्ता महिलांची (Missing Women) वाढती संख्या आणि लव्ह जिहादसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारले असता ते म्हणाले, दुसऱ्या धर्मातील (Religion) व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा, असं विधान फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

बेपत्ता महिला आणि लव्ह जिहाद बाबत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, बेपत्ता महिलांच्या तक्रारींवर आम्ही खूप संवेदनशील आहोत. आकडे पाहिले तर बेपत्ता महिलांच्या प्रकरणात या महिलांचा शोध घेण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. तर काही ठिकाणी हे प्रमाण 95 टक्के आहे. असं असलं तरी यात अधिक जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

फडणवीस पुढे म्हणाले, दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसला पाहिजे. पण सध्या महिलांची दिशाभूल करुन, खोटी आश्वासनं देऊन लग्न केली जात आहेत. ज्या लोकांचं आधीच लग्न झालं आहे ते वेगळी ओळख सांगून महिलांची फसवणूक (Cheating) करत आहेत. यावरुन लव्ह जिहादच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असल्याचे दिसत आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

राज्य सरकार (State Government) लव्ह जिहाद प्रकरणावर सजग असून आम्ही यावर कायदा तयार करण्याचा विचार करत आहोत.
आम्ही सध्या वेगवेगळ्या राज्यातील कायद्यांचा अभ्यास करत आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

बाल तस्करीच्या (Child Trafficking) मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, गृहखातं बाल तस्करीच्या प्रश्नावर संवेदनशील आहे.
आम्ही सातत्याने मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत.
महराष्ट्राने बालतस्करीवर जेवढी कारवाई केली आहे तेवढी कारवाई इतर कोठेही झालेली नाही.
महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत हे प्रकार रोखण्याचं काम राज्य सरकार करत आहे.

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis big statement on inter religious marriage love jihad

Related Posts