IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले – ‘शरद पवारांचा पक्ष म्हणजे, पानी तेरा रंग कैसा…’

by nagesh
Devendra Fadnavis | goa assembly election 2022 former maharashtra cm devendra fadnavis targets ncp sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis | नुकतंच पाच राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली आहे. ”भाजपा (BJP) निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल” असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) टोला लगावला आहे. (Devendra Fadnavis)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निश्चितच गोव्यात भाजप सरकार स्थापन करेल. आम्ही कोणतीही निवडणूक कमकूवत असल्याचं मानत नाही. परंतु आम्ही कोणासोबत लढणार आहोत हेच निश्चित होणं शिल्लक आहे. विरोधातले पक्षच आपापसात स्वत:ला मोठं म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा कोणासोबत लढायचंय हे निश्चित झाल्यावर पुढचं विश्लेषण करता येईल,” असं फडणवीस यांनी एका सवालावर उत्तर दिलं.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. “विरोधकांचा जोवर प्रश्न आहे, पवारांचा पक्ष असा आहे ‘पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाए उसके जैसा’. ते कधी सपाशी संवाद साधतात, कधी टीएमसीशी संवाद साधतात. तो राष्ट्रीय पक्ष नाही. त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व नाही, राष्ट्रीय विचारही नाहीत, नाव राष्ट्रवादी असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला ते दाखवणं गरजेचं आहे. ते थोड्या जागांवर लढण्यावर विचार जरी करत असले तरी त्याचा कोणताही फायदा होणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”कोणताही पक्ष कोणासोबतही एकत्र येऊ शकतो. पण याबद्दल काही सांगता येणार नाही. परंतु आता जी परिस्थिती आहे, त्यावर त्यांना सोबत घेण्यासाठी कोणी तयार होईल असं वाटत नाही.” असेही त्यांनी नमुद केलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Devendra Fadnavis | goa assembly election 2022 former maharashtra cm devendra fadnavis targets ncp sharad pawar

हे देखील वाचा :

BMC WhatsApp Chatbot | जय महाराष्ट्र ! बृहन्मुंबई मनपा (BMC) ठरली व्हॉट्सअपवर 80 सेवा देणारी देशातील पहिली महापालिका

Supreme Court On Bride Jewellery | सुप्रीम कोर्ट ! सुरक्षेसाठी वधुचे दागिने आपल्या जवळ ठेवणे क्रुरता नाही

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार

Related Posts