IMPIMP

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

by nagesh
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देखील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. पहिल्याच बैठकीत नव्या आलेल्या सरकारने मुंबई मेट्रोचे (Mumbai Metro) कारशेड ‘आरे’मध्येच होण्याविषयी राज्याच्या महाधिवक्त्यांना कोर्टात बाजू मांडण्याबाबत सूचना केल्या आहेत. दरम्यान याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोध केला दर्शविला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांचा आदर आणि मुंबईकरांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेऊ,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मेट्रो कारशेडच्या प्रश्नावर बोलताना दिली आहे. आजच फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“आरेमध्येच जेव्हा पुन्हा एकदा कारशेड होण्याबाबत निर्देश देण्यात आले. तेव्हा मला वाईट वाटले.
आरेमध्येच कारशेड होण्याचा हट्ट धरू नका,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. “माझ्यावर राग असला तरी चालेल.
पण माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबई मेट्रोची आरे कारशेड ही पर्यावरणासाठी योग्य नाही.
त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. ही जागा निश्चित करण्यात आली. तेव्हा एकाच रात्रीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली.
ही कारशेड झाली तर तेथील वन्यजीव आणि वनजीवनाला मोठा धोका निर्माण होईल.” असं ते म्हणाले.

 

“आता तेथे कारशेड झाल्यास ते पुढे-पुढे वाढत जाईल आणि आरेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करूनच मुंबई मेट्रोची कारशेड आरेमध्ये नको, या निर्णय घेत माझ्या पहिल्या मंत्रिमंडळात यावर स्थगितील दिली होती.
कांजूरमार्गची जागा अनेकार्थाने चांगली आहे. त्यामुळे कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव नाकारू नका,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | after uddhav thackeray statement deputy cm devendra fadnavis said on metro car shed issue that we will take an appropriate decision

 

हे देखील वाचा :

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील मादक अदावर चाहते झाले घायळ, पाहा व्हायरल फोटो…

Compressed Biogas (CBG) | कॉम्प्रेस्ड बायोगॅस इंधनापासून पुणे शहरातील बसेस चालविण्याचे उपक्रमाचे उद्घाटन

 

Related Posts