IMPIMP

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी परिणामकारक आहे कच्ची हळद, जाणून घ्या कशी

by nagesh
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Control | मधुमेह (diabetes) हा एक आजार आहे जो खराब जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे होतो. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी तुमचे शरीर इन्सुलिन योग्य प्रकारे तयार करत नाही किंवा वापरत नाही तेव्हा हा आजार होतो. पूर्वी हा आजार वाढत्या वयात लोकांना होत असे, पण आता लहान वयातच हा आजार लोकांना होऊ लागला आहे. (Diabetes Control)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध जितके प्रभावी आहे, तितकेच घरगुती उपायही प्रभावी आहेत. असे काही पदार्थ आहेत जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. कच्ची हळद (Raw Turmeric) हा देखील असाच एक मसाला आहे जो ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

 

हळद हा औषधी गुणधर्मांनी समृद्ध असा मसाला आहे, ज्याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके केला जात आहे. वेदना कमी करण्यासाठी आणि अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त आहे. कच्च्या हळदीमध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, फॉस्फरस, थायामिन, रिबोफ्लेविन असते, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. (Diabetes Control)

 

मधुमेहामध्ये कच्च्या हळदीचे फायदे :

कच्च्या हळदीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

कच्च्या हळदीचा वापर करून इन्सुलिनची पातळी योग्य राखता येते.

मधुमेहाच्या रुग्णांनी कच्च्या हळदीचे सेवन करावे.

कच्ची हळद मधुमेह कशी नियंत्रित करते, जाणून घ्या संशोधन :
हळदीचा सक्रिय घटक कर्क्युमिन आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. 2013 च्या संशाधनानुसार, कर्क्यूमिन ब्लड शुगर लेव्हल कमी करू शकते, तसेच इतर मधुमेह-संबंधित गुंतागुंत कमी करू शकते.

 

संशोधकांना असेही आढळून आले आहे की कर्क्युमिनची मधुमेह प्रतिबंधात प्रभावी भूमिका असू शकते. क्युरक्यूमिन आणि हळदीचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.

 

हळदीचा आरोग्याला कसा होतो फायदा?

1. इम्युनिटी मजबूत करते (Strengthens immunity) :
कच्च्या हळदीचे सेवन केल्याने इम्युनिटी मजबूत होते, तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. हळदीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. पचनक्रिया सुधारते (Improves Digestion):
कच्च्या हळदीचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन पचनास मदत करते. कर्क्युमिनमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, अँटी इम्फ्लेमेटरी गुणधर्म पचन सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

 

3. लिव्हर निरोगी ठेवते (Keeps the liver healthy) :
कच्च्या हळदीचे सेवन केल्याने लिव्हर निरोगी राहते. कच्चया हळदीचा वापर सूप, भाज्या, दूध, पाणी, चटण्या, सलाड आणि लोणच्यामध्ये करता येतो.
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन लिव्हरच्या समस्यांपासून संरक्षण करते. लिव्हरचा विषारीपणा, फॅटी लिव्हर डिसीज आणि लिव्हर सिरोसिस सारख्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी हळद खूप प्रभावी आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Diabetes Control | raw turmeric can fight against diabetes know the more effective benefits

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 50 हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न ! लाच देऊन PhD मागणाऱ्या शिक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Shamita Shetty Worth | अभिनेत्री शमिता शेट्टीकडे कोट्यवधींची संपत्ती; पण सिनेविश्वात फ्लॉप

Salman Khan | सलमान खान लवकरच अडकणार विवाह बंधनात?

 

Related Posts