IMPIMP

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

by nagesh
Diabetes - High Blood Sugar Level | diabetes patient can eating papaya increase blood sugar know what is the truth

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Diabetes – High Blood Sugar Level | भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. एका अहवालानुसार, जगभरात सुमारे 52 कोटी लोक या धोकादायक आजाराने ग्रस्त आहेत. मधुमेहाच्या या आजारात ब्लड शुगर लेव्हल वाढते, त्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Diabetes – High Blood Sugar Level)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मधुमेहाच्या या आजारात ब्लड शुगर वाढते, कारण शरीर इन्सुलिन कमी बनवते किंवा त्याचा योग्य वापर करू शकत नाही. इन्सुलिन हे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांना खाण्या-पिण्याबाबत अनेक प्रकारची खबरदारी घ्यावी लागते.

 

मधुमेहात ब्लड शुगर वाढल्याने हृदयविकार, तणाव, डोकेदुखी, अंधुक दृष्टी, अवयव निकामी होणे यासह अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. मात्र, जर दैनंदिन जीवनात बदल केला तर शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते. (Diabetes – High Blood Sugar Level)

 

दिनचर्या बदला :

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफीऐवजी कोमट पाणी प्यावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, शिवाय शरीर हायड्रेटही राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज त्यांची ग्लुकोज पातळी तपासली पाहिजे. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी सकस नाश्ता केला पाहिजे. भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असलेले पदार्थ खा. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांना दररोज चालण्याचा सल्ला दिला जातो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पपईचे फायदे :

भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.
पपईची ग्लायसेमिक पातळी मध्यम असल्याने मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. मात्र, तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

मधुमेहामध्ये फायदेशीर

मधुमेही रुग्णांसाठी पपईचे सेवन चांगला पर्याय ठरू शकतो.
संशोधनानुसार, टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांनी उच्च फायबरयुक्त आहार घ्यावा.
पपईमध्ये भरपूर फायबर असते, त्याचे सेवन रक्तातील साखर, लिपिड आणि इन्सुलिनची पातळी सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Diabetes – High Blood Sugar Level | diabetes patient can eating papaya increase blood sugar know what is the truth

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | सोशल मीडियावर ओळखीतून ज्येष्ठ महिलेला ५७ लाखांचा गंडा

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर

Satara Crime | माजी महिला उपनगराध्यक्षांना मारहाण; भाजपच्या ‘या’ माजी नगरसेवकावर FIR

 

Related Posts