IMPIMP

Digital Life Certificate | पेन्शन मिळण्यात येईल अडथळा, असा जनरेट करा डिजिटल हयातीचा दाखला; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

by nagesh
Life Certificate | good news for for pensioners life certificate last date to submit extended to 28 feb 2022 check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Digital Life Certificate | पेन्शनर्सला वर्षातील एक दिवस बँक, पोस्ट ऑफिस किंवा आपल्या ऑफिसात जाऊन सांगावे लागते की, तो जिवंत आहे आणि त्याची पेन्शन चालू ठेवण्यात यावी. निवृत्तीनंतर अनेक लोकांना चालण्या-फिरण्याचा खुप त्रास होतो. तरीही पेन्शनर्सला (pensioners) वर्षभरात एक दिवस या त्रासाचा सामना करावा लागतोच. (Digital Life Certificate)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

परंतु आम्ही तुम्हाला डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (digital life certificate) म्हणजेच हयातीच्या दाखल्याबाबत सांगणार आहोत. ज्यानंतर पेन्शनर्सला कोणत्याही ऑफिसमध्ये जाऊन आपण जिवंत असल्याचा दाखला द्यावा लागणार नाही. हा दाखला डिजिटल पद्धतीने आधार कार्डच्या मदतीने तयार होईल. डिजिटल हयातीच्या दाखल्याबाबत जाणून घेवूयात

 

आयडी तयार करा –

 

यासाठी Jeevan Pramaan अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि register as a new user पर्यायात जाऊन आधार, नाव, बँक खाते,
पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि इतर डिटेल भराव्या लागतील.
त्यानंतर एक ओटीपी जनरेट होईल. जो रजिस्टर मोबाइल नंबरवर येईल.
ओटीपी आणि आधार नंबर भरल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा आयडी तयार झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ऑनलाइन हयातीचा दाखला तयार करण्याची पद्धत –

 

आयडी जनरेट झाल्यानंतर दुसर्‍या ओटीपीद्वारे अ‍ॅपमध्ये लॉगिन करा.
यानंतर जेनरेट लाईफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) पर्यायावर क्लिक करा आणि आधार आणि मोबाइल नंबर नोंदवा.
यानंतर तुमच्या समोर पीपीओ नंबर, वितरण एजन्सीचे नाव आणि इतर माहिती नोंदवण्यासाठी ऑपशन येईल.
जी भरल्यानंतर आधार डेटा वापरून पेन्शनर्स फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन करू शकतील.
यानंतर तुमचा हयातीचा दाखला स्क्रीन असेल आणि एसएमएसद्वारे पेन्शनधारकाच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येईल.

 

असा जमा करा हयातीचा दाखला

 

तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

डोअरस्टेप बँकिंगद्वारे जमा करा

 

देशभरात 12 सरकारी बँका अशा आहेत ज्या देशातील 100 प्रमुख शहरात डोअरस्टेप बँकिंगची सुविधा देतात.
त्यांच्या सर्व्हिसेस अंतर्गत लाईफ सर्टिफिकेट सुद्धा जमा करता येते.
यासाठी मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट किंवा टोल फ्री नंबरद्वारे बुकिंग केले जाते.
नंतर डोअरस्टेप बँकिंग एजंट घरी येऊन पेन्शनर्सला सेवा देतो.
Doorstep Banking (DSB) अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता किंवा बँकांच्या वेबसाइटवर जाऊ शकता
किंवा 18001213721, 18001037188 टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता.

 

पोस्टमनकडून जमा करा

 

मागील वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये पोस्टमनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) जमा करण्याची डोअर स्टेप सर्व्हिस लाँच झाली होती.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टमन आणि ग्रामीण पोस्टमनद्वारे ही सुविधा दिली जाते.
मोबाइलद्वारे ही सुविधा मिळवण्यासाठी पेन्शनर्सला गुगल प्ले स्टोअरवरून Postinfo App इन्स्टॉल करावे लागते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Digital Life Certificate | pensioners benefit from digital life certificate

 

हे देखील वाचा :

Girish Mahajan | ‘भाजपात आलं की दुसरीकडं संसार करण्याची इच्छा होत नाही’ – गिरीश महाजन

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 43 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

जर हरवले असेल Aadhar Card आणि नसेल रजिस्टर्ड मोबाइल नंबर तरी सुद्धा डाऊनलोड करू शकता आधार, जाणून घ्या सोपी पद्धत

 

Related Posts