IMPIMP

Dilip Walse Patil | बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची विधानसभेत मागणी, गृहमंत्री वळसे पाटील यांनी केली ‘ही’ घोषणा

by nagesh
Dilip Walse Patil | court stated that from 10 pm till 6 am loudspeakers should not be played says maharashtra home minister dilip walse patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनबीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या (Crime) पार्श्वभूमीवर विधानसभेत भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या आमदारांमध्ये (MLA) एकमत झाल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची (Suspension) मागणी केली. यानंतर भाजप आमदार नमिता मुंदडा (BJP MLA Namita Mundada) यांनीही अधीक्षकांची तक्रार केली. भाजपने हा मुद्दा उचलून धरत सभागृहात गदारोळ केला. आमदारांच्या गदारोळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा (Beed SP R. Raja) यांना तात्काळ रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आक्षेपानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी ही घोषणा केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) सभागृहात बीडमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीवरुन ठाकरे सरकारला (Thackeray Government) घेरलं. फडणवीस यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच भाजपच्या आमदारांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांचे (Superintendent of Police) तात्काळ निलंबन करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) किती बिघडलीय याची सत्ताधारी आमदाराचीच तळमळ पहा. जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार (Firing) झाला. एका वर्षात दुप्पट गुन्हे वाढले. मात्र यातील 85 टक्के देखील गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. वाळूमाफियाचे भयानक गुन्हे चालू आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवून विनंती केलीय की स्वतंत्र बैठक आयोजित करा. परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. या आरोपींकडे बंदूका (Gun) येतात कोठून. या परवानाधारक बंदुका नाहीत. जिल्ह्यात गृहखात्याला अपयश आले आहे. गोळीबाराची वरिष्ठांकडून चौकशी झाली पाहिजे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते असून त्यांच्यावर कारवाई करणार आहात का ? असे फडणवीस म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फडणवीस यांच्या आक्षेपानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना तातडीने रजेवर (Leave) पाठवणार असल्याची घोषणा केली.
दरम्यानच्या काळात चौकशी (Inquiry) होणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
सर्वपक्षीय आमदारांनी केलेल्या तक्रारींचा विचार करुन गृहमंत्र्यांनी (Home Minister) हा निर्णय जाहीर केला.
बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना तातडीने सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.

 

राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप
बीडमध्ये आज सर्व अवैध धंदे सुरु आहेत. मटका, गुटखा, दरोडे, चोऱ्या अशा घटना मोठ्या प्रमाणात सुरु आहेत आणि निष्पाप जीव जात आहेत.
पोलीस खात्याची प्रतिमा अत्यंत मलीन झाली आहे. बीड जिल्ह्याचा बिहार (Bihar) झाला आहे.
पोलीस खात्यातील बदल्यांमध्येही भ्रष्टाचार होतोय. पोलीस हप्ता गोळा करतात. पोलीस अधीक्षकांच्या कारवायांची वरिष्ठांकडून चौकशी करावी.
या अधिकाऱ्याची त्वरित बदली करणार का यावर उत्तर द्यावं, असे राष्ट्रावादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- dilip walse patil beed sp to be sent on leave immediately says maharashtra home minister dilip walse patil

 

हे देखील वाचा :

Maharashtra Local Body Elections | महापालिका, ZP निवडणुका 6 महिने लांबणीवर? नवीन वॉर्ड रचनेला स्थगिती?

Petrol Diesel Price Hike | उद्यापासून बसणार महागाईचा जोरदार झटका? पेट्रोल-डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लीटरपर्यंत होऊ शकते वाढ

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरातील 7 सराईत गुन्हेगारांविरूध्द ‘मोक्का’ कारवाई, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 70 वी मोक्का कारवाई

 

Related Posts