IMPIMP

Maharashtra Local Body Elections | महापालिका, ZP निवडणुका 6 महिने लांबणीवर? नवीन वॉर्ड रचनेला स्थगिती?

by nagesh
Pune News | Digital media in Pune were denied passes to reporters while Digital India was being empowered

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Local Body Elections | स्थानिक स्वराज्य संस्थामधील मतदारसंघाची रचना तयार करण्याचे अधिकार आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारकडे देणारे विधेयक (Bill) विधानसभा (Legislative Assembly) आणि विधान परिषदेत (Legislative Council) आज मंजूर करण्यात आले. सध्या करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द झालेली असून निवडणुका (Maharashtra Local Body Elections) किमान सहा महिने पुढे जाणार आहेत. यासाठीचे विधेयक आज दोन्ही सभागहात कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Maharashtra Local Body Elections) तोंडावरच पेच निर्माण झाला आहे. ओबोसींचे राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे. निवडणूक आयोग (Election Commission) सध्या त्यांच्याकडे असलेल्या अधिकारामुळे निवडणूक जाहीर करतो. त्यात बदल करुन निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला (State Government) मिळावे यासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हे विधेयक मांडले.

 

 

भुजबळ यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणावरुन असाच गोंधळ मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) देखील झाला होता. याठिकाणि निवडणूक आयोगाचे अधिकार काढून राज्य सरकारकडे घेण्यात आले. तसेच काहीसे आपण करत असल्याचे भूजबळ यांनी सांगितले. सत्ताधारी आणि विरोधक यांची आज सकाळी बैठक झाली. यामध्ये या विधेयकाला मंजूरी घेण्यात आली. प्रभागरचना आणि आरक्षण यांची माहिती आता शासन गोळा करेल आणि शासन ही माहिती निवडणूक आयोगाला देईल. त्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेईल. तसेच प्रभाग रचनेवर स्थगिती आणली असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की,
आज जे विधेयक मंजूर झाले यामध्ये संपूर्ण प्रभाग रचना ही रद्द झालेली आहे.
आता नव्याने सरकार प्रभाग रचना तयार करेल. यामुळे राज्यातील निवडणुकाही पुढे जातील.
तारीख ठरवण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे.
यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचे काही अधिकार हे सरकारकडे आले आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Local Body Elections | local body elections may be postponed by six months

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price Hike | उद्यापासून बसणार महागाईचा जोरदार झटका? पेट्रोल-डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लीटरपर्यंत होऊ शकते वाढ

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरातील 7 सराईत गुन्हेगारांविरूध्द ‘मोक्का’ कारवाई, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 70 वी मोक्का कारवाई

Atul Bhatkhalkar | ‘पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात…त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे’, भाजप आमदाराचा शरद पवारांना टोला

 

Related Posts