IMPIMP

Dilip Walse Patil | एकनाथ शिंदेना सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप, माजी गृहमंत्री वळसे-पाटलांचा खुलासा

by nagesh
Dilip Walse Patil | ncp-leader and former maharashtra home minister dilip walse patil reaction over allegations of uddhav thackeray not provide appropriate security to eknath shinde

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील (Shinde Group) संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. यातच आता एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली (Security Provided) नसल्यावरुन बंडखोर आमदारांनी (Rebel MLA) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठा खुलासा केला आहे. बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करुन एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली होती, असा खुलासा दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी (Threat from Naxalites) मिळाल्यानंतर तत्कालीन सरकारने त्यांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिंदे यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी फोन करुन तुम्ही असे आदेश देऊ शकत नाही. शिंदे यांना कोणतीही सुरक्षा देऊ नये, अशा सूचना दिल्याचा मोठा दावा कांदे यांनी केला. यावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

वळसे पाटील यांनी शिंदे गटाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) मागितली होती.
मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नाही.
शिंदे यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर
त्यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना (Thane Police), पोलीस विभागाला दिल्या होत्या.
त्यामुळे ही चर्चा अनावश्यक आहे. अशा प्रकारची पत्रे सार्वजनिक जीवनात येत असतात.
पोलीस विभाग त्याचे विश्लेषण करुन त्यावर काय कारवाई करायची हे ठरवते, असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dilip Walse Patil | ncp-leader and former maharashtra home minister dilip walse patil reaction over allegations of uddhav thackeray not provide appropriate security to eknath shinde

 

हे देखील वाचा :

Pune Crime | माहिती लपवून बँकेची केली पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक; कमलेश बेताला याच्यावर गुन्हा दाखल

Chandrakant Patil | मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले- ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य केला, पण…’

Bhabiji Ghar Par Hai | ’भाभी जी घर पर हैं’ मधील ‘मलखान’चे निधन, शूटींगला जाण्यापूर्वी क्रिकेट खेळताना घेतला अखेरचा श्वास

 

Related Posts