IMPIMP

Dr. Mohan Bhagwat | ‘…आता संघाला कोणतेही आंदोलन करायचे नाही’ – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

by nagesh
 Mohan Bhagwat | we should not rule by making such a distinction between hindus and muslims mohan bhagwat

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Mohan Bhagwat | ज्ञानवापीच्या (Gyanvapi Row) मुद्द्यावरून देशातील वातावरण ढवळून निघत आहे. मात्र ही घटना इतिहासात घडली होती. त्यामुळे हिंदू व मुस्लिम पक्षांनी अतिवादी पणा टाळला पाहिजे. न्यायव्यवस्थेचा आदर मुस्लिमांनी केला पाहिजे. त्याचबरोबर हिंदुनीही रोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. असे सांगतानाच प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधता, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले. दरम्यान, ‘राम मंदिर आंदोलनात संघ सहभागी झाला होता. मात्र सध्या संघाची भूमिका काय आहे हे 9 मे ला स्पष्ट केले होते. त्यामुळे संघाला आता कोणतेही आंदोलन करायचे नाही,’ असेही त्यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) तृतीय वर्ष वर्गाचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) म्हणाले, “इस्लामी राज्यकर्त्यांनी देशावर आक्रमण केल्यानंतर अनेक मंदिरे तोडली. हा जो प्रयत्न होता तो हिंदूंच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा. आता हिंदूंना वाटू लागले आहे की, अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा. मात्र, आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत.”

 

“चर्चेतून ज्ञानवापी संदर्भात मार्ग काढला पाहिजे. कोणी न्यायालयात गेले तर न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे.
कोणाच्याही पूजा पद्धतीचा संघाला विरोध करायचा नाही. परंतु, कोणीही दुसऱ्यांच्या धर्म पद्धतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये.
एकता आणि समन्वयातूनच देशाला विश्वगुरु बनवता येईल.
फाळणींनंतर जे पाकिस्तानात गेले नाही त्यांनी येथील परंपरेशी व संस्कृतीशी समरस व्हायला हवे.
दोन्ही धर्मांच्या लोकांनी एकमेकांना धमक्या देणे टाळले पाहिजे,” असेही ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dr. Mohan Bhagwat | do not find shivlings in every mosque the sangh does not want to make any agitation now dr mohan bhagwat

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीची CM उद्धव ठाकरेंना विनंती करणार’ – जयंत पाटील

Pankaja Munde | ‘माझे कार्यकर्ते सोबर, धनंजय मुंडेचे कार्यकर्ते दबंग’ – पंकजा मुंडे

Pune Pimpri Crime | महिलेवर बलात्कार करुन अश्लिल फोटो पतीला पाठवून बदनामी; उस्मानाबादच्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केले अटक

 

Related Posts