IMPIMP

Pankaja Munde | ‘माझे कार्यकर्ते सोबर, धनंजय मुंडेचे कार्यकर्ते दबंग’ – पंकजा मुंडे

by nagesh
Maharashtra Politics News | will pankaja munde and dhananjay munde get together end of sister brother conflict

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Pankaja Munde | भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना प्रसार माध्यमांशी बोलताना काही सवाल केले होते. परळी मतदारसंघात तुमचे अधिक वर्चस्व आहे की धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे वर्चस्व जास्त आहे, असा सवाल करताच पंकजा मुंडेंनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. ‘माझे कार्यकर्ते ‘सोबर’, आणि धनंजय मुंडेचे कार्यकर्ते ‘दबंग’,’ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “परळीतील काहीजण हे धनंजय मुंडे यांना मानतात. तर काहीजणांना माझं नेतृत्त्व मान्य आहे. समाजात दोन्ही प्रवृत्तीची लोकं असतात. धनंजय मुंडे आणि मी एकत्र होते. तेव्हाही आमच्या विरोधात ताकदवान प्रवृत्ती होत्या. अगदी गोपीनाथ मुंडे असतानाही त्यांच्याविरोधात असणाऱ्या लोकांना चांगली मते पडायची. धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडल्यावर मुंडे विरोधकांपैकी बराच मोठा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला. त्यामुळे सद्यस्थितीत धनंजय मुंडे आणि माझ्या ताकदीमध्ये फार फरक नाही.”

 

त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, “आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा ही चांगली आहे. तर धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते हे दबंग प्रवृत्तीचे असून ते राजकारणात ‘मसल पॉवर’चा वापर करतात. तर, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेब असताना धनंजय हे विधानपरिषदेचे आमदार झाले, त्यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद होते. त्यांच्याभोवती मुंडे साहेबांचे सुरक्षा कवच होते. आज ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना या सुरक्षा कवचाचा फायदा होत असेल,” असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde on ncp leader dhananjay munde beed

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | महिलेवर बलात्कार करुन अश्लिल फोटो पतीला पाठवून बदनामी; उस्मानाबादच्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केले अटक

Rajya Sabha Election 2022 | ‘सकाळपासून ‘ऑफर’ चं राजकारण ! अखेर राज्यसभा निवडणूक होणार; भाजप-शिवसेनेत चुरशीची लढत अटळ

Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; मायलेकीचा जागीच मृत्यू तर बापलेक गंभीर जखमी

 

Related Posts