IMPIMP

ED Notice To Eknath Khadse | ईडीची एकनाथ खडसेंना नोटीस ! जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याचे निर्देश

by nagesh
ED Notice To Eknath Khadse | NCP leader eknath khadse ordered to take down confiscated property by ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED Notice To Eknath Khadse | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) नोटीस बजावण्यात आली आहे. जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, अशी नोटीस ईडीने खडसे यांना बजावली आहे. जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये (Land Scam Case) ईडीकडून एकनाथ खडसे यांची जागा जप्त करण्यात आली होती. तीच जागा आता रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली आहे. (ED Notice To Eknath Khadse)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ खडसे यांची ऑगस्ट 2021 मध्ये पाच कोटी 75 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. यात जळगाव आणि लोणावळा येथील जागेचा समावेश होता. भोसरी एमआयडीसी जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी (Bhosari MIDC Land Case) संबंधित कारवाई केली होती. फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असताना एकनाथ खडसेंनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर 31 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची फक्त 3.75 कोटी रुपयांमध्ये विक्री झाल्याचा दावा केला होता. (ED Notice To Eknath Khadse)

 

दरम्यान, रेडी रेकनर किंमतीपेक्षा खूपच कमी बाजारभाव दाखवून जमिनीची खरेदी करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी एकनाथ खडसे अनेकवेळा अडचणीत आले आहेत. त्यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे. आता जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करा, याबाबत ईडीने (ED) खडसेंना नोटीस बजावली आहे.

 

Web Title :- ED Notice To Eknath Khadse | NCP leader eknath khadse ordered to take down confiscated property by ed

 

हे देखील वाचा :

Atal Pension Yojna च्या अंतर्गत पती-पत्नीला दरमहिना 10,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Mhada Exam Paper Leak Case | म्हाडा पेपरफुटी प्रकरणात प्रितीश देशमुखला जामीन

Devendra Fadnavis | ‘GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन कर्तबगारी दाखवा’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा

 

Related Posts