IMPIMP

Mhada Exam Paper Leak Case | म्हाडा पेपरफुटी प्रकरणात प्रितीश देशमुखला जामीन

by nagesh
 Pune Crime | Bail granted to accused in Gram Panchayat fraud case by forging letterpad, stamp and Sarpanch signature

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनMhada Exam Paper Leak Case | म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या व जी. ए. सॉफ्टवेअर (G.A. Software) कंपनीचा प्रमुख प्रितीश देशमुख (Pritish Deshmukh) याला अखेर जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे (Additional Sessions Judge V.A. Patravale) यांनी देशमुख याचा बुधवारी (दि.1 जून) सशर्त जामीन मंजूर करुन 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर (Mhada Exam Paper Leak Case) मुक्तता केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात (Mhada Exam Paper Leak Case) जामीन मंजूर करताना सध्या राहण्याचा आणि कायमचा पत्ता पोलिसांना द्यावा, इमेल आयडी आणि एका नातेवाईकाचे आधार कार्ड द्यावे, कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करु नये, तपास अधिकाऱ्यांच्या (Investigating Officer) परवानगी शिवाय भारत सोडू नये, देशमुख याने कायदा व सुव्यवस्था (Law and Order) राखावी असे आदेश दिले आहेत. यापैकी कोणत्याही अटी शर्तीचा भंग केल्यास जामीन रद्द होऊ शकतो.

 

आरोग्य विभागाच्या (Health Department) परीक्षांचे पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास सुरु असतानाच प्रितीश देशमुख याच्याकडून पेन ड्राईव्हसह इतर साहित्य जप्त करण्यात आल्याने म्हाडाचे पेपरही फुटल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे आरोग्य विभाग आणि टीईटी परीक्षांचे फुटलेले पेपर देशमुख याच्याच कंपनीकडून तयार केले होते.

 

वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
आरोग्य विभाग आणि टीईटी परीक्षांचे (TET Exams) फुटलेले पेपर देशमुख याच्याच कंपनीकडून तयार केले होते. मात्र परिक्षेबाबत गोपनीयता राखली नाही, प्रश्नपत्रिका हाताळण्यात कुचराई केली. प्रश्नपत्रिका देऊन त्याबदल्यात आरोपी पैसे घेणार होता, कट रचला असे आरोप ठेवण्यात आले होते. आरोपीतर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी युक्तीवाद करताना, म्हाडा पेपर फोडण्यासाठी दबाव टाकणाऱ्या लोकांबद्दल आरोपीने संबंधित विभागाकडे तक्रारी अर्ज केला होता, तसेच पेपर सेट करणे, प्रिटिंगसाठी पाठवणे ही जबाबदारी आरोपीची असल्यामुळे त्याच्याकडे या सर्व गोष्टी मिळून येणे स्वाभाविक आहे, असे मुद्दे न्यायालयात मांडण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सर्व प्रश्नपत्रिका जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीकडे होत्या. आरोपीकडून सध्या कसलीही रिकव्हरी बाकी नाही.
म्हाडाचा पेपर फुटल्याची अफवा पसरताच संबंधित यंत्रणेला सर्वात प्रथम आरोपीने कळवले होते.
आणि फसवणुकीचा (Cheating) प्रयत्न करणे हा गुन्हा होऊ शकत नाही, असेही आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
न्यायालयाने त्यांचा युक्तीवाद मान्य करुन आरोपी प्रितीश देशमुखचा जामीन मंजूर केला.
अ‍ॅड. दिग्विजयसिंह ठोंबरे (Adv. Digvijay Singh Thombre), अ‍ॅड. निलेश वाघमोडे (Adv. Nilesh Waghmode) यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांना सहाय्य केले.

 

 

Web Title :- Mhada Exam Paper Leak Case | GA software pritish deshmukh granted bail in mhada exam paper leak case

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘GST रक्कम मिळाली, आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन कर्तबगारी दाखवा’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोमणा

Anil Parab Sai Resort Case | अनिल परबांच्या रिसॉर्ट प्रकरणी केंद्राचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Sourav Ganguly Resign As BCCI President? | सौरभ गांगुलीचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा ?; ट्विट करत म्हणाला…

 

Related Posts