IMPIMP

Eknath Shinde | विरोधकांच्या टिकेला एकनाथ शिंदेंचे ‘रोखठोक’ प्रत्युत्तर, म्हणाले – ‘विरोधक 28 नोव्हेंबरला बेनाम दिवस म्हणतात, पण…’

by nagesh
Cabinet Expansion | know how many independent mlas will be minister in eknath shinde and devendra fadnavis government

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मुलगा विक्रम याच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आदेश बांदेकर जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे आले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी वधु-वरांना आशीर्वाद दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government) स्थापन होऊन आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विवर्षपूर्ती निमित्ताने भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकेल? याबाबत अनेक दावे करण्यात आले. तसेच भाजप (BJP) नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवही सडकून टीका केली जात आहे. या टीकेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, 28 नोव्हेंबर हा बेनाम दिवस असल्याचा आरोप विरोधक करतात. परंतु महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक हे म्हणत आहेत. आम्ही आमचं काम करत आहोत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहोत. त्यामुळे कोण काय म्हणतो याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी असल्याची टीका विरोधकांनी केली.
यावर बोलताना शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, विरोधी पक्ष हे विरोधी पक्षाचे काम करतात.
मात्र निवडून देणारे व सत्तेत बसवणारी ही सर्वसामान्य जनता आहे.
आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी जे काही कामे करण्यात आली आहेत.
त्यावर सर्वसामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
त्यामुळे कोण काय बोलते याची चिंता आम्ही करत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

 

Web Title :- Eknath Shinde | Shivsena leader and minister eknath shinde gives answer to bjp leaders allegations in jalgaon

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू

Omicron Variant | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आज फेरविचार?

LIC New Jeevan Anand | ‘एलआयसी’ची ‘ही’ पॉलिसी खुप कामाची ! विना प्रीमियम मिळते 10 लाखाचे कव्हर आणि दरवर्षी बोनस

 

Related Posts