IMPIMP

EPFO | PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती ! घरबसल्या इतर खात्यात ट्रान्सफर करु शकता पैसे; जाणून घ्या

by nagesh
Tax On EPF | effect of tax on epf know experts dhirendra kumar view

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) आपल्या PF खातेधारकांसाठी (PF Account Holders) महत्वाची माहिती समोर आली आहे. PF खातेधारकांच्या सुविधेसाठी EPFO हे वेळोवेळी अपडेट करत असते. दरम्यान, आता यासाठी सदस्यांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये. PF खातेधारक आता घरी बसून त्यांचे पीएफचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजपणे हस्तातरीत (Online Money Transfer) करु शकणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये काही सोपे मार्ग सांगितले आहेत, ज्याच्या सहाय्याने ग्राहक त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतात. दरम्यान, सदस्यांसाठी EPFO ने बुधवारी सकाळी 11:26 वाजता अपडेट जारी केलं आहे.

 

दरम्यान, समजा तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसेही ट्रान्सफर करायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला युनिव्हर्सल अकाउंट क्रंमाक (UAN) अ‍ॅक्टिव्हेट करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त खातेदाराकडे बँक खाते, आधार कार्ड क्रमांक (Aadhar Card Number) आणि इतर सर्व आवश्यक सविस्तर माहिती देखील असणे गरजेचे आहे.

 

खात्यात सहजपणे हस्तांतरित करण्यासाठी –

युनिफाइड मेंबर पोर्टलला भेट देऊन UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

ऑनलाइन सर्व्हिसवर (Online Services) क्लिक केल्यानंतर, तुम्हाला Online Member – One EPF Account (Transfer Request) वर जावे लागणार आहे.

तसेच, सध्याच्या कंपनीशी संबंधित Personal Information आणि पीएफ खात्याचा व्हेरिफाय करावे लागणार आहे.

Get Details ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला मागील कंपनीचे पीएफ खाते तपशील दिसणार आहे.

फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी मागील अथवा वर्तमान कंपनी निवडा.

UAN रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP मिळवण्यासाठी Get OTP वर क्लिक करा. यानंतर, ओटीपी टाकल्यानंतर Submit वर क्लिक करा.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, OTP टाकल्यानंतर तुम्ही काम करत असलेल्या कंपनीला ऑनलाइन पैसे हस्तांतरण (Transfer) प्रक्रियेची विनंती पाठविली जाईल. यानंतर, पैसे हस्तांतरण प्रक्रियेस ३ दिवस लागतात. या दरम्यान, हे पैसे तुम्हाला पाहिजे असलेल्या खात्यात हस्तांतरण होतील. तसेच, कंपनी तुमच्या सांगितलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेल, ज्याची EPFO च्या क्षेत्रीय अधिकाऱ्याद्वारे पडताळणी केली जाणार आहे.

 

Web Title :-  EPFO | epfo subscribers you can transfer epf money online know all the easy steps

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व, ते कोणाची B टीम म्हणून काम करणार नाहीत’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार सुरज ठोंबरे टोळीतील तडीपार गुन्हेगार अजिंक्य काळेला हत्यारासह गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Pune Crime | घरात थेट वीजचोरी अन् जनमित्रास मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

 

Related Posts