IMPIMP

Chandrakant Patil | ‘राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व, ते कोणाची B टीम म्हणून काम करणार नाहीत’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | chandrakant patil on central government order about maharashtra chief minister

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | मनसे (MNS) ही भाजपची (BJP) बी टीम असल्याचं विधान मागील काही दिवसापासून
राज्यातील सत्ताधारी आघाडीमधील नेते करताना दिसत आहे. दरम्यान या विषयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी
प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे (Raj Thackeray) हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत. ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नसल्याचे,’ विधान चंद्रकांत
पाटील यांनी केलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ”राज ठाकरेंनी काही कोणत्या धर्मावर आक्रमण केले नाही. त्यांनी ध्वनी प्रदुषणाच्या दृष्टीने त्यांची भूमिका मांडली आहे. नमाज पाडायला त्यांनी विरोध केला नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्व धर्मांना आदर असायला हवा असं पाटील म्हणाले. जन्मापासूनचं भाजप हिंदुत्वाचा मुद्दा मांडत आहे. एक दुसऱ्यांच्या धर्माबद्दल आदर केला पाहिजे असे पाटील म्हणाले. राज ठाकरेंनी भोंग्या संदर्भात जे वक्तव्य केलं, त्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, मी त्यावर काही बोलणार नाही.” असं ते म्हणाले.

 

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या देशातून वजा केला तर हिंदुत्वाचे काय झाले असते ते सर्वसामान्य माणसांना माहितय. संघाने मोठ्या प्रमाणावर लोकांचे रक्षण केले. हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम संघाने केल्याचे ते म्हणाले. हे सरकार गुन्हा दाखल करण्याची एकही संधी सोडत नाही. पण न्यायालयात गेल्यावर तोंडावर पडतात. असलेल्या सत्तेचं दुरुपयोग करुन हे सुरु असल्याचं,” पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ”मेहबुबा मुफ्तींना (Mehbooba Mufti) एका लाईन वर आणण्यासाठी भाजप (BJP) त्यांच्यासोबत गेली.
मात्र, त्या योग्य लाईनवर येत नाहीत, असे दिसल्यावर भाजप बाहेर पडली, हे धाडस शिवसेनेत (Shivsena) आहे का?
असं पाटील म्हणाले. आतंकवाद्यांना विरोध करणाऱ्यांना सोबत घेऊन सरकार तयार करणे गरजेचे होते. मात्र, मेहबुबा मुफ्तींना ज्यावेळी पाकिस्तानी धार्जिणी भूमिका घेतली, त्यावेळी भाजप सरकारमधून बाहेर पडला,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

Web Title : Chandrakant Patil | MNS Chief raj thackeray is an independent personality he will not work for anyone b team says chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरात थेट वीजचोरी अन् जनमित्रास मारहाण करणारा कंत्राटी कर्मचारी बडतर्फ

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार सुरज ठोंबरे टोळीतील तडीपार गुन्हेगार अजिंक्य काळेला हत्यारासह गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ! अटकेपासून तूर्तास संरक्षण, जाणून घ्या अटी व शर्थी

 

Related Posts