IMPIMP

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) किती आहे शिल्लक, ईपीएफओने सांगितली पद्धत

by nagesh
EPFO | how to check pf balance through missed call epfo pf account holder get interest in pf provident fund account

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO | प्रायव्हेट सेक्टरचे कर्मचारी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करतात. कर्मचार्‍यांच्या पगारातून दर महिना एक ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होते. परंतु तुम्ही कधी तुमचे पीएफ खाते उघडून चेक केले आहे का, की त्यामध्ये किती पैसे आहेत. पीएफ खात्यात पैसे जमा होत आहे की नाही. तुम्ही काही मिनिटात केवळ एक मिस्ड कॉल देऊन बॅलन्स कसा जाणून घेवू शकता ते EPFO ने सांगितले आहे.

 

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या पीएफ बॅलन्स

EPFO ने सांगितले आहे की यूएएन पोर्टलवर रजिस्टर्ड सदस्य मिस्ड कॉल देऊन आपला बॅलन्स जाणून घेवू शकतात.
आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल. येथे सुद्धा तुम्हाला बँक अकाऊंट नंबर, पॅन आणि आधार यूएएनसोबत लिंक असणे आवश्यक आहे.

हा कॉल दोन रिंगनंतर आपोआप बंद होईल.

या सर्व्हिससाठी पैसे लागणार नाहीत.

मिस्ड कॉल सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी करावे लागेल हे काम

 

1. पोर्टलवर येएएनसोबत मोबाईल नंबर अ‍ॅक्टिव्हेट असावा.

2. यूएएनचा बँक अकाऊंट नंबर, आधार किंवा पॅन नंबरपैकी एखाद्याने केवायसी असावे.

 

काय आहे यूएएन नंबर (UAN Number)

 

ईपीएफओ यूनिव्हर्सल अकाऊंट नंबरची सुविधा देते. ज्याद्वारे खातेधारक आपला पीएफबॅलन्स पाहू शकतो. हा नंबर बँक अकाऊंटप्रमाणे असतो. आपला यूएएन नंबर अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर क्लिक करू शकता.

Web Title :- EPFO | how to check pf balance through missed call epfo pf account holder get interest in pf provident fund account

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी

Pune Municipal Corporation Election 2022 | प्रभाग 28 आणि 40 मधील अनुसूचित जातीचे आरक्षण उडाले; प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये पडले

Pune Crime | पुण्यातील 9 जणांच्या कोयता गँगवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 78 वी कारवाई

Related Posts