IMPIMP

Pune Municipal Corporation Election 2022 | प्रभाग 28 आणि 40 मधील अनुसूचित जातीचे आरक्षण उडाले; प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये पडले

by nagesh
Pune Municipal Corporation Election 2022 | Blows up Scheduled Caste reservations in Wards 28 and 40; Ward no. Fell between 42 and 47

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Municipal Corporation Election 2022 | “महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची (PMC Election 2022) अंतिम प्रभाग रचना (PMC Final Ward Structure) नुकतीच जाहीर झाली असून अनुसूचित जाती आणि जमातीची (Scheduled Castes and Scheduled Tribes) आरक्षणही जाहीर झाली आहेत. प्रभाग रचना (Prabhag Structure) अंतिम करताना लोकसंख्येतील बदलांमुळे प्रारूप प्रभाग रचनेतील प्रभाग क्र. 28 आणि 40 मधील अनुसूचित जाती चे आरक्षण उठले असून अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये आरक्षण पडले आहे. अनुसूचित जाती साठी 58 प्रभागातील 173 जागांमध्ये 23 जागा या अनुसूचित जातीसाठी तर 2 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. प्रभाग रचना अंतिम करताना लोकसंख्या व अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत बदल झाल्याने आरक्षण बदल झाले आहेत. (Pune Municipal Corporation Election 2022)

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

प्रारूप प्रभाग रचनेमध्ये प्र. क्र. 28 महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (Mahatma Phule Smarak – Timber Market Prabhag Ward) मधील लोकसंख्या 67 हजार 292 होती. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 10 हजार 262 होती. अंतिम रचनेमध्ये या प्रभागात बदल झाला आहे. या प्रभागाचे नाव महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ (Mahatma Phule Smarak – Bhavani Peth) असे करण्यात आले व काही भाग वगळण्यात आला. यानंतर या प्रभागाची लोकसंख्या 57 हजार 463 इतकी झाली. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 7 हजार 137 पर्यंत कमी झाली. (Pune Municipal Corporation Election 2022)

 

प्रभाग क्र. 40 गंगाधाम – सॅलसबरी पार्क (Gangadham – Salisbury Park Prabhag Ward) या प्रभागात प्रारूप प्रभागरचनेत 59 हजार 882 लोकसंख्या होती. त्यामध्ये 8 हजार 46 लोकसंख्या अनुसूचित जातीची होती. अंतिम प्रभाग रचनेत या प्रभागाचे नाव बिबवेवाडी – गंगाधाम (Bibvewadi Gangadham Prabhag Ward) असे करण्यात आले आहे. या प्रभागाला नवीन काही भाग जोडल्याने लोकसंख्या 62 हजार 740 झाली. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 8 हजार 167 झाली.

दुसरीकडे प्रभाग क्र. 47 कोंढवा – येवलेवाडी प्रभागामध्ये (Kondhwa-Yewalewadi Prabhag Ward)
काही भाग नवीन जोडला तर काही वगळला आहे. यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत या ठिकाणी
असलेली 55 हजार 662 ही लोकसंख्या अंतिम रचनेत 54 हजार 492 इतकी कमी झाली.
मात्र अनुसूचित जातीची प्रारूप रचनेत असलेली 6 हजार 969 इतकी लोकसंख्या 9 हजार 206 पर्यंत वाढली.
यामुळे प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी वाढल्याने अंतिम रचनेत येथे आरक्षण पडले आहे.

 

तर प्रारूप प्रभाग रचनेतील प्र. क्र. 42 सय्यद नगर – लुल्लानगर या प्रभागाचे (Syed Nagar – Lullanagar Prabhag Ward)
नाव अंतिम रचनेत रामटेकडी – सय्यद नगर (Ramtekdi – Sayyed Nagar Prabhag Ward)
असे करण्यात आले आहे. अंतिम रचना करताना यामध्ये मोठया प्रमाणावर मोडतोड करण्यात आली आहे.
प्रारूप रचनेत या प्रभागाची लोकसंख्या 57 हजार 764 होती. त्यामध्ये 6 हजार 108 अनुसूचित जातीची लोक संख्या होती.
अंतिम रचनेत या प्रभागची लोकसंख्या 49 हजार 25 इतकी कमी झाली.
मात्र रामटेकडीतील काही भाग जोडल्याने अनुसूचित जातीची लोकसंख्या 9 हजार 370 पर्यंत पोहोचली.
प्रारूप रचनेत अनुसूचित जातीच्या टक्केवारीत 39 व्या स्थानावर असलेला हा प्रभाग
अंतिम रचनेत टक्केवारीनुसार थेट 12 व्या क्रमांकावर आला आहे.

Web Title :- Pune Municipal Corporation Election 2022 | Blows up Scheduled Caste reservations in Wards 28 and 40; Ward no. Fell between 42 and 47

Pune Crime | पुण्यातील 9 जणांच्या कोयता गँगवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 78 वी कारवाई

ERSS Police New Helpline Number | आता लवकरच 100 नाही तर 112 नंबरवर पोलिसांची मदत मिळणार

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा 11 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

Related Posts