IMPIMP

EPFO-LIC | एलआयसीचा प्रीमियम भरण्यासाठी येत असेल आर्थिक अडचण तर EPFO अ‍ॅडव्हान्समधून भरू शकता रक्कम, जाणून घ्या कसा करावा अर्ज

by nagesh
EPFO-LIC | problem in paying the premium of lic so epfo can pay the amount in advance

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO-LIC | देशात बहुतांश लोक भारतीय आयुर्विमा महामंडळाकडूनच (Life Insurance Corporation of India) पॉलिसी खरेदी करणे पसंत करतात. आता एलआयसीचे काही समभाग सरकारने विकले असले तरी सरकारची सुद्धा भागीदारी एलआयसीमध्ये (EPFO-LIC) आहे. कोरोना महामारीमुळे असंख्य लोकांच्या नोकर्‍या गेल्याने अनेकांना एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम (premiums for LIC lic policies) भरण्यात समस्या येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जर तुम्हाला ही समस्या असेल आणि तुमच्याकडे EPF खाते असेल तर अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण तुम्ही EPF खात्याच्या खात्याच्या मदतीने पॉलिसीचा प्रीमियम सहज भरू शकता. या प्रक्रियेबाबत जाणून घेवूयात :

 

EPFO कडून कशी मिळेल मदत?
इम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड स्कीम 1952 (Employees Provident Fund Scheme 1952) अंतर्गत ईपीएफ खातेधारक आपल्या विमा पॉलिसीचा हप्ता EPF अ‍ॅडव्हान्सद्वारे भरू शकतात. यासाठी काही कागदी कार्यवाही पूर्ण (EPFO-LIC) करावी लागेल.

 

असे काढू शकता EPF अ‍ॅडव्हान्स –
एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी अ‍ॅडव्हान्स हवे असल्यास EPF ऑफिसमध्ये याची माहिती द्यावी लागेल. एलआयसी पॉलिसी खरेदी करतानाही ईपीएफओमधून पैसे भरू (EPFO-LIC) शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सोबतच नंतर काही हप्त्यांच्या पेमेंटसाठी फॉर्म 14 (Form 14) जमा करू शकता. हा फॉर्म EPFO च्या वेबसाइट (EPFO website) वर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर ईपीएफओ खात्यातून हप्त्याच्या तारखेच्या अगोदरच एलआयसीचा प्रीमियम आपोआप कापला जाईल.

 

ईपीएफ अ‍ॅडव्हान्स (EPF Advance) पूर्वी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

 

* ईपीएफ खात्यात पुरसे पैसे आहेत का हे तपासा.

* विमा पॉलिसीचा पहिला हप्ता भरायचा असेल तर खात्यात 2 वर्षांचे प्रीमियम भरण्यासाठी पुरेसे पैसे असावेत. (EPFO-LIC)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- EPFO-LIC | problem in paying the premium of lic so epfo can pay the amount in advance

 

हे देखील वाचा :

Monalisa In Blue Bikini | निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये मोनालीसाचा ‘हाॅट’ आणि सेक्सी अंदाज; फोटो झाले व्हायरल

Anil Deshmukh | सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांची तपासाबाबत ‘ती’ मागणी करणारी याचिका फेटाळली; माजी गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

IND Vs NZ | ‘या’ माजी क्रिकेटपटूनं सांगितली हिटमॅन रोहितच्या कॅप्टनसीमधील चूक

 

Related Posts