IMPIMP

EPFO मध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट; UAN द्वारे होईल काम; जाणून घ्या

by nagesh
EPFO | pf contributions exceeding rs 2 5 lakh will be taxed 10 points

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | सेवानिवृत्तीसाठी पीएफची रक्कम (PF Amount) खूप महत्त्वाची मानली जाते, ही रक्कम निवृत्तीच्या वेळी खूप मदत करते. म्हणून हे पैसे काढू नयेत असा सल्ला तज्ज्ञ देतात. परंतु सर्व तपशील योग्यरित्या भरले असतील तरच तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता. (EPFO)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

जर तुम्ही नोकरी बदलली असेल आणि बँक खाते अपडेट केले नसेल तर खूप त्रास होऊ शकतो. घरबसल्या बँके डिटेल्स कसे अपडेट करवेत ते जाणून घेवूयात…

 

UAN द्वारे अपडेट करा बँक डिटेल्स
जुना किंवा चुकीचा खाते क्रमांक EPFO मध्ये नोंदला गेला असेल तर नवीन बँक खाते UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबरद्वारे सहज अपडेट करू शकता.

अशी आहे प्रक्रिया

– सर्वप्रथम EPFO च्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.

आता टॉप मेनूवरील ’Manage’ टॅबवर क्लिक करा.

ड्रॉप डाउन मेनूमधून KYC पर्यायावर जा आणि डॉक्युमेंट टाइपमध्ये Bank निवडा.

आता नवीन बँक खात्याचा खाते क्रमांक आणि IFSC कोड भरल्यानंतर save वर क्लिक करा.

आता रिक्वेस्ट KYC Pending for Approval म्हणून दिसेल.

आवश्यक कागदपत्रे कंपनीकडे जमा करा.

कंपनीकडून मंजूरी मिळाल्यानंतर, केवायसी पेंडिंग फॉर अ‍ॅप्रव्हल बदलून डिजिटली अ‍ॅप्रुव्ह केवायसी दिसेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

असा तपासा पीएफ बॅलन्स

EPFO सदस्यांनी www.epfindia.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

आता ’Our Services’ टॅबमधून ’For Employees’ पर्यायावर क्लिक करा.

Services टॅबमधून ’Member Passbook’ वर क्लिक करा.

यानंतर लॉग इन करण्यासाठी UAN आणि पासवर्ड टाका. PF खात्याचे पासबुक पाहता येईल.

 

Web Title :- EPFO | you can update bank details with epfo using UAN at home check full process

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिंपरी-चिंचवडच्या ‘सासु’ विभागाकडून 1 लाखाचा गुटखा जप्त; एकाला अटक अन् पुण्याच्या रास्ता पेठेतील बडा डिलर मिथुन नवलेविरूध्द गुन्हा दाखल

MPSC Recruitments | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 900 पदांवर मेगा भरती, 11 जानेवारीपर्यंत करू शकता अर्ज

Christmas Festival 2021 | ख्रिसमससाठी राज्य सरकारची नियमावली जारी; जाणून घ्या नवीन नियम

 

Related Posts