IMPIMP

Facebook Nearby Friends Feature | फेसबूक 31 मेपासून काही महत्त्वाचे फीचर्स बंद करणार

by nagesh
Pune Crime | Husband Defames Wife Through Fake Facebook Account; Incidents in Chandannagar area

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Facebook Nearby Friends Feature | सध्याच्या युगात फेसबूक (Facebook) हा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म अधिक
गतीने चालताना दिसत आहे. जगात फेसबूकचं जाळं पसरलं आहे. दरम्यान सध्या एक मोठी माहिती समोर येत आहे. फेसबुक लवकरच काही फीचर्स
(Features) बंद करणार आहे. फेसबुकचे नियरबाय फ्रेंड्स फीचर (Nearby Friends Feature) 31 मे पासून बंद होणार आहे. या फीचरच्या
माध्यमातून नागरीकांना फेसबुक युजर्ससह आपलं सध्याचं लोकेशन शेअर करता येत होतं. मात्र आता नियरबाय फ्रेंड्स फीचर (Facebook Nearby
Friends Feature) आणि इतर लोकेशन बेस्ड फीचर्स बंद होण्यासंदर्भात सुचित केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नियरबाय फ्रेंड्स या फीचरसह फेसबुक वेदर अलर्ट (Weather Alert), लोकेशन हिस्ट्री (Location History) आणि बॅकग्राउंड लोकेशनही (Background Location) बंद केलं जाणार आहे. त्याचबरोबर फेसबुक Facebook App वर एका नोटिफिकेशनद्वारे फ्रेंड्स नियरबाय फीचर बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. युजर्सला पाठवण्यात आलेल्या एका नोटिफिकेशन मध्ये कंपनीने म्हटलं आहे की, या फीचरच्या माध्यमातून कोणते फ्रेंड्स तुमच्या जवळपास आहेत, हे सांगणारं नियर बाय फीचर 31 मे 2022 पासून उपलब्ध नसणार आहे.

 

फेसबुकने 2014 मध्ये iOS आणि अँड्रॉइड दोन्हीसाठी नियरबाय फ्रेंड्स फीचर रोल आउट करण्यास सुरूवात केली होती. आता वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री, बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शनही फेसबुकवरुन हटवण्यात येणार आहेत. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी 1 ऑगस्ट पर्यंतचा वेळ दिलाय. त्यानंतर ते काढून टाकण्यात येणार आहे. दरम्यान, ते इतर अनुभवांसाठी युजर्सच्या लोकेशनची माहिती मिळवणं चालूच ठेवेल. असंही सांगितलं आहे.

 

Web Title :- Facebook Nearby Friends Feature | facebook will discontinue nearby friends and other three features including location history

 

हे देखील वाचा :

Pune NCP | पाणी प्रश्नाबाबत आणि मिळकत कर वाढ रद्द करण्याबाबत राष्ट्रवादीचे पालिका आयुक्तांना निवेदन

Cosmo Films Shares | गुंतवणूकदारांची चांदी ! ‘हा’ शेअर अवघ्या 5 रुपयांवरून थेट 1800 रुपयांवर पोहोचला

Raveena Tandon New Look | रवीना टंडनच्या समर लूकनं इंटरनेटवर केला कहर, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

 

Related Posts