IMPIMP

FIR On 3 Leaders Of Shivsena UBT | मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह ३ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?

by sachinsitapure
FIR On 3 Leaders Of Shivsena UBT

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – FIR On 3 Leaders Of Shivsena UBT | लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचे उद्घाटन करून तो लोकांच्या वापरासाठी खुला करून दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह सुनील शिंदे, सचिन अहिर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ नोव्हेंबर रोजी परवानगीशिवाय या ब्रिजचे उद्धाटन करण्यात आले होते. हे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे. (FIR On 3 Leaders Of Shivsena UBT)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात (NM Joshi Police Station) फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. एनएम जोशी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध भादंवि कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

https://x.com/ANI/status/1725703058078986717?s=20

लोअर परळमधील डेलिसल ब्रिजचे काम अद्याप बाकी असताना १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे
आणि इतर काही नेत्यांनी या पुलाचे उद्घाटन केले आहे.
याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Posts