IMPIMP

Footballer Pele | ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले रुग्णालयात

by nagesh
Footballer Pele | former brazilian football great pele has been hospitalized and his daughter nascimento gave an update

सरकारसत्ता ऑनलाईन  – Footballer Pele | सध्या कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांची मुलगी नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. (Footballer Pele)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय लिहिले पोस्टमध्ये?

सप्टेंबर 2021मध्ये पेलेच्या कोलनमधून एक ट्यूमर काढण्यात आला होता. तेव्हापासून ते नियमितपणे रुग्णालयात तपासणी आणि उपचारांसाठी येत असतात. यावेळीही अशीच नियमित तपासणी आहे. ”माझ्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मीडियामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या येत आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले आहेत. कोणतीही इमरजन्सी नाही. तसेच ही गंभीर बाब नाही. मी नवीन वर्षासाठी येथे आहे आणि वचन देते की मी काही फोटोदेखील पोस्ट करेन,” असे नॅसिमेंटोने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे. (Footballer Pele)

 

कोण आहेत पेले?

फ़ुटबॉल जगतात पेले यांचे नाव आदराने घेतले जाते. ते जगातील महान फुटबॉलपटू आहेत.
1958 च्या विश्वचषकात त्यांनी दमदार कामगिरी केली होती. तेव्हा त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते.
1958 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पेलेने सुदानविरुद्ध 2 गोल केले होते.
5 वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा ब्राझील हा जगातील एकमेव देश आहे.
पेलेने आपल्या कारकिर्दीत (1958, 1962 आणि 1970) तीन वेळा ब्राझीलसाठी विश्वचषक जिंकला आहे.
त्यांनी ब्राझील संघाकडून खेळताना 92 सामन्यात 77 गोल केले आहेत.
पेलेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले असून, त्यामध्ये आणि 1281 गोल केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Footballer Pele | former brazilian football great pele has been hospitalized and his daughter nascimento gave an update

 

हे देखील वाचा :

Grampanchayat Elections | अनेकांना ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज न भरता आल्यामुळे निवडणूक आयोग स्वीकारणार ऑफलाइन अर्ज; अर्ज भरण्याच्या वेळेतही वाढ

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला हत्यारासह मुंढवा पोलिसांकडून अटक

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; “मी घराबाहेर पडलोय, तर यांच्या पोटात…”

 

Related Posts