IMPIMP

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला हत्यारासह मुंढवा पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Kondhwa: Arrested three people who beat the investigating beat marshal police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून मुंढवा परिसरात हत्यारासह फिरणाऱ्या एकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई (Pune Crime) बुधवारी (दि.30 नोव्हेंबर) मगरपट्टाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या ब्रिजखाली सापळा रचून करण्यात आली. सागर शंकर घोडके (वय – 22, रा. किर्तनेबाग लोणकर वस्ती, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपी सागर घोडके याला पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 यांनी 18 एप्रिल 2022 रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. बुधवारी मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाला आरोपी सागर घोडके हा तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून परिसरात हत्यारासह फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घोडके याला मगरपट्टाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या ब्रिजखाली सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून धारदार हत्यार जप्त केले आहे. आरोपीवर आयपीसी 142, 37 (1) (3) सह आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

ही करावाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त (पूर्व) नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस अंमलदार दिनेश राणे,
संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, राजू कदम, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, संचिन पाटील यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Mundhwa Police Arrest Criminal who deported out of city

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | माझ्यामुळे भाजपची अडचण होत असेल, तर… – उदयनराजे भोसले

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; “मी घराबाहेर पडलोय, तर यांच्या पोटात…”

Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! बालविवाहप्रकरणी पतीवर FIR; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Vijay Deverakonda | विजय देवरकोंडाची ईडीच्या चौकशीला हजेरी; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी

 

Related Posts