IMPIMP

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; “मी घराबाहेर पडलोय, तर यांच्या पोटात…”

by nagesh
  Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande complained against yuva sena leaders to ed and eow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील दोन वर्षे कोरोना महामारीच्या प्रकोपमध्ये गेली. त्यात त्यांची तब्येत चांगली नसल्याने ते क्वचितच मातोश्रीतून बाहेर आले. त्यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) भरपूर टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही काही दिवसांपूर्वी झालेल्या मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. आता राज ठाकरेंच्या त्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबईच्या वांद्रे येथे लहुजी वस्ताद साळवी जयंती कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. “मी हळूहळू बाहेर पडतोय. महाविकास आघाडी सरकार असताना दोन वर्षे कोरोनात गेली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने मला सहा महिने अराम करावा लागला. त्यामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याने हा (राज ठाकरे) घराबाहेर पडत नाही, अशी टीका करण्यात येत होती. आता मी घराबाहेर पडलोय, तर यांच्या (राज ठाकरे) पोटात गोळा यायला लागला आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

 

तत्पूर्वी, मुंबईच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची टीका केली होती.
“काल-परवा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर आहेत असे…मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते.
एकनाथ शिंदेंनी एका रात्री कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. पण, मी यांच्यासारखं वागणारा नाही.
स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं”,
असे राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | mns raj thackeray on konkan visit slams uddhav thackeray shivsena

 

हे देखील वाचा :

Arvind Sawant | ‘…तोपर्यंत भाजपचा कोणताही नेता महाराष्ट्रात फिरू शकणार नाही’ – अरविंद सावंत

Abhijeet Sawant | मराठी संस्कृतीबद्दल अभिजीत सावंतचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाला…..

Vijay Deverakonda | विजय देवरकोंडाची ईडीच्या चौकशीला हजेरी; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी

 

Related Posts