IMPIMP

FSSAI | ग्राहकांना खराब अन्न खाऊ घालणे रेस्टॉरंट, ढाबा चालकांना पडणार महागात ! 1 ऑक्टोबरपासून बिलावर 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक

by nagesh
FSSAI | feeding spoiled food to restaurants and dhabas-will now cost more 14 digit registration number required on food bill from october 1

नवी दिल्ली : वृत्तसंस्था FSSAI | जर तुम्ही एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलात किंवा रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर जेवण केले, परंतु जेवणाची क्वालिटी चांगली नसेल किंवा असे अन्न खाल्ल्याने आजारी पडलात तर तुम्ही (FSSAI) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (Food Safety and Standards Authority of India) तक्रार करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

FSSAI चे सीईओ अरुण सिंघल (fssai ceo arun singhal) यांनी एका चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, आगामी 1 ऑक्टोबरपासून एफएसएसएआयचा रजिस्ट्रेशन नंबर खाण्याच्या बिलावर लावणे आवश्यक आहे (14 digit registration number required on restaurants and dhabas food bill), ज्यामुळे दर्जा आणि गुणवत्ता योग्यप्रकारे तपासता येईल.

बिलावर लायसन्स नंबर आवश्यक

एफएसएसएआयने रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांसाठी 1 ऑक्टोबरपासून बिलावर एफएसएसएआय लायसन्स नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर नोंदवणे आवश्यक केले आहे. ज्या रेस्टॉरंटच्या मालकांचा वीस लाखाच्या वर व्यवसाय आहे त्यांना रजिस्ट्रेशन नंबर आपल्या बिलावर छापणे बंधनकारक केले आहे.

 

तक्रारीची अंमलबजावणी सोपी

अरुण सिंघल यांनी दावा केला की, हा नियम आल्याने रेस्टॉरंट अथवा फूड ऑपरेटर्सविरूद्ध तक्रार मिळाल्यास त्यावर कारवाई करणे सोपे होईल.

दर्जा तपासणीसाठी मोबाइल व्हॅन

खाद्य पदार्थांची क्वालिटी तपासण्यासाठी एफएसएसएआयने फिरती लॅब सुरू केली आहे.
या मोबाइल व्हॅनद्वारे अवघ्या पाच मिनिटात खाद्याचा दर्जा तपासला जाईल. यामध्ये दोन तंत्रज्ञ असतील जे तपासणी करतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

काय होणार कारवाई

अरुण सिंघल यांनी म्हटले की, 1 ऑक्टोबरपासून जर खाद्याच्या बिलावर लायसन्स नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर नोंदला नसेल तर कडक कारवाई होऊ शकते. फूड सेफ्टी अधिकारी दुकान बंद करून मालकाविरूद्ध कायदेशीर तरतुदी अंतर्गत कारवाई करू शकतो, ज्यामध्ये कारावासाची सुद्धा शिक्षा आहे.

सणासुदीच्या काळात जास्त उपयोगी

सामान्यपणे सणासुदीच्या काळात असे दिसून येते की, मोठ्या प्रमाणात मिळाईमध्ये भेसळ करण्याच्या तक्रारी येतात.
अरुण सिंघल यांनी म्हटले की, अशा विशेष प्रसंगी अशाप्रकारच्या मोबाइल व्हॅन खुप उपयोगी ठरतील.

त्यांनी म्हटले की, सध्याच्या काळात 100 पेक्षा जास्त व्हॅन आहेत, परंतु आगामी काळात देशातील प्रत्येक जिल्ह्यात 1 मोबाइल लॅब उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

 

Web Title : FSSAI | feeding spoiled food to restaurants and dhabas-will now cost more 14 digit registration number required on food bill from october 1

 

हे देखील वाचा :

Pune Neo Metro | पुण्यासाठी ‘निओ मेट्रो’ महामेट्रोच्या विचाराधीन ! ‘हा’ फायदा होणार, जाणून घ्या

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

Pune Metro | पुण्यातील मेट्रोचा बांधकाम क्षेत्राला फायदाच : डॉ. ब्रिजेश दीक्षित

 

Related Posts