IMPIMP

Gangster Chhota Rajan | पुराव्यांअभावी कुख्यात गुंड छोटा राजनसह चौघांची निर्दोष मुक्तता

by nagesh
Gangster Chhota Rajan | gangster chhota rajan court order lack of evidence against

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   मुंबईतील कुख्यात गुंड छोटा राजन (Gangster Chhota Rajan) आणि त्याच्या चार साथीदारांची 2009 सालच्या दुहेरी हत्येच्या आरोपांतून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. छोटा राजन विरोधात पुरावे गोळा करण्यास सरकारी यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळे छोटा राजन (Gangster Chhota Rajan) या गुन्ह्यातून मुक्त झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

न्यायालयाने यावेळी निकाल देताना यंत्रणांना खडे बोल सुनावले. राजन विरोधात गुन्हा सिद्ध करण्यास तपास यंत्रणांना अपयश आल्याचा ठपका यावेळी न्यायालयाने ठेवला. यातील महत्वाची बाब म्हणजे छोटा राजन या चौथ्या प्रकरणातून निर्दोष मुक्त होत आहे. या चारही आरोपांत न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्यास यंत्रणांना अपयश आले. त्यामुळे या चार प्रकरणांतून राजन निर्दोष सुटला आहे. राजनवर आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच राजन हा भारतातील आघाडीच्या दहा गुन्हेगारांपैकी (Top 10 Criminals in India) एक आहे. 25 ऑक्टोबर 2015 रोजी राजनला बाली (इंडोनेशिया) (Bali, Indonesia) येथून अटक करण्यात आली होती.

 

राजनवर 30 ऑक्टोबर 1999 रोजी दहिसर परिसरात एका व्यापाऱ्याच्या हत्त्येसंबंधी दहिसर पोलीस
ठाण्यात (Dahisar Police Station) हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
यानंतर आरोपपत्र दाखल केल्यानंतर राजन फरारी आरोपी म्हणून या गुन्ह्यात नोंद होता.
1999 साली दहिसरमधील व्यापारी नारायण पुजारी (Narayan Pujari) याच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न करताना राजनच्या टोळीतील चौघांनी त्या व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. 2015 साली राजनला बालीतून अटक केल्यावर त्याच्यावर सर्व गुन्ह्याची सुनावनी न्यायालयात सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gangster Chhota Rajan | gangster chhota rajan court order lack of evidence against

 

हे देखील वाचा :

Nysa Devgan | न्यासा देवगणने ‘अशाप्रकारे’ केले तिचे ट्रान्सफॉर्मेशन, काजोलने सांगितले ‘हे’ ब्युटी सीक्रेट

Maharashtra Cabinet Decisions | राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Shahnaz Gill | धडक चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर शहनाज गिलचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

 

Related Posts