IMPIMP

General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI) | राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या आणखी काही दिवस रखडणार?

by nagesh
General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI) | Will the general transfers of police inspectors in the state police force be delayed for a few more days?

पुणे (नितीन पाटील) :

General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI) | राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या आणखी काही दिवस रखडणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या किमान महिनाभर तर होणार नाहीत अशी चर्चा पोलिस वर्तुळामध्ये आहे. कोरोना काळामध्ये पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांना मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर गतवर्षी बदल्या झाल्या मात्र त्या देखील अल्पप्रमाणात करण्यात आल्या होत्या. आता सुमारे 500 ते 600 पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करावयाच्या असल्यामुळे त्या बदल्यांना काहीसा वेळ लागत असल्याचे सांगितले जात आहे. (General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI)

पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना महिनाभर मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडून गृह विभागाकडे पाठविण्यात आल्याची चर्चा मुंबईत (डीजी ऑफिस) होती. त्याची खातरजमा करण्यासाठी पोलीसनामा ऑनलाइनने काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे संपर्क साधला असता त्यांनी बदल्यांच्या मुदतवाढीबाबत लेखी प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही पण बदल्या काही दिवस रखडणार असल्याचे सांगितले आहे. (General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI)

गृह विभागाने राज्य पोलिस दलातील तब्बल 143 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दि. 22 मे 2023 रोजी सहाय्यक पोलिस आयुक्त Assistant Commissioner Of Police (ACP) / पोलिस उप अधीक्षक Deputy Superintendent Of Police ( DySP) पदावर बढती दिली आहे तर त्याच दिवशी राज्यातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक (DySP) / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (ACP) सर्वसाधारण बदल्या (General Transfers Of ACP / DySP) करण्यात आल्या आहेत. डीवायएसपी/एसीपींच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या होत असतात. मात्र, यंदा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांना आणखी किमान महिन्याभराचा कालावधी आहे अशी चर्चा होत आहे. असे असले तरी राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या लवकरात लवकर करण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.

बदल्या रखडणार असल्यानं कुठं ‘खुशी’ कुठं ‘गम’

पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना आणखी काही दिवस लागणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने
काही निरीक्षकांकडून आनंद तर काही निरीक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कार्यकाल संपलेल्या पण कार्यकारी पदावर असणार्‍या निरीक्षकांना आणखी काही दिवस ‘भव्य दिव्य’ वातावरणात घालवता येणार आहेत
तर अकार्यकारी पदावर कार्यरत असणार्‍या निरीक्षकांना मात्र आणखी काही दिवस ‘अंधारा’तच काढावे लागणार आहेत.
कार्यकाल संपलेल्यांपैकी अनेकजण बदल्या रखडाव्यात तसेच मुदतवाढ मिळावी म्हणून देव पाण्यात ठेऊन आहेत
तर काहीजण कधी एकदा सर्वसाधारण बदल्या होतात याची वाट पहात आहेत.

Web Title : General Transfers Of Maharashtra Police Inspectors (PI) | Will the general transfers of
police inspectors in the state police force be delayed for a few more days?

Related Posts