IMPIMP

New Parliament Building Inauguration | ‘…तर बरं झालं असतं’, नव्या संसद भवनाच्या लोकार्पणानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

by nagesh
New Parliament Building Inauguration | raj thackeray reaction on new parliament building inauguration

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – New Parliament Building Inauguration | नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी झाले. या कार्यक्रमावर देशातील 19 पक्षांनी बहिष्कार टाकला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी त्याची सुरुवात केली. त्यानंतर राहुल गांधींच्या सोबत देशातील 19 पक्ष आले. मात्र सरकारच्या समर्थनार्थ 25 पक्ष आले. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी ट्वीट करत भूमिका मांडली आहे. (New Parliament Building Inauguration)

संसदेची नवी इमारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, जो आज पूर्णत्वास गेला आहे. मोदींनी स्वत: या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यांनी स्वत: या वास्तूचं उद्घाटन केलं आहे. याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला. या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते व्हायला हवं होंतं, अशी भूमिका विरोधकांनी मांडली. तर काहींनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी उद्घाटन करायला हवं, अशी भूमिका मांडली. मात्र, विरोधी पक्षांच्या मागणीला, त्यांच्या विरोधाला सत्ताधाऱ्यांनी जुमानलं नाही. (New Parliament Building Inauguration)

याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली,

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

ती लागली नसती तर बरं झालं असतं.
असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही
टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.

Web Title : New Parliament Building Inauguration | raj thackeray reaction on new parliament building inauguration

Related Posts