IMPIMP

Gold Hallmarking | सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग 256 जिल्ह्यांमध्ये लागू, सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राला करायचाय विस्तार; जाणून घ्या यामुळे होतो कोणता लाभ ?

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 11 january 2022 sonya chandi che dar

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – Gold Hallmarking | ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 256 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यात आले आहे आणि ते सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्याची तयारी सुरू आहे. एकूणच, अनिवार्य हॉलमार्किंग सुरळीतपणे सुरू आहे आणि देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मंत्रालयाने मंत्रिमंडळासाठी तयार केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे. (Gold Hallmarking)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अनिवार्य हॉलमार्किंग लागू केल्यानंतर भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये नोंदणीकृत दागिने विक्रेत्यांची संख्या जवळपास चौपट झाली आहे. अहवालात म्हटले आहे की आतापर्यंत 1.27 लाख ज्वेलर्सनी हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी BIS मध्ये नोंदणी केली आहे, आणि देशात 976 BIS मान्यताप्राप्त AHC कार्यरत आहेत.

देशात ऑटोमेशन सॉफ्टवेअर आणल्यानंतर पाच महिन्यांत सुमारे 4.5 कोटी दागिने हॉलमार्क करण्यात आले आहेत. हॉलमार्किंग हे एक गुणवत्ता प्रमाणपत्र आहे, जे 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. या 256 जिल्ह्यांमध्ये किमान एक हॉलमार्किंग (Gold Hallmarking) केंद्र आहे.

जर तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांवर/सोन्याच्या नाण्यावर BIS (ब्यूरो ऑफ स्टँडर्ड्स) हॉलमार्क दिसला तर याचा अर्थ ते BIS ने निर्धारित केलेल्या मानकांना अनुरूप आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना खरेदी केलेल्या सोन्याच्या शुद्धतेबद्दल खात्री दिली जाते. याचा अर्थ, जर तुम्ही हॉलमार्क केलेले 18K सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर याचा अर्थ असा होईल की 18/24 भाग सोन्याचा आहे आणि बाकीचा मिश्रधातू आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सोने खरेदी करताना खालील चार घटक पहावेत (हॉलमार्क सीलच्या लेसर एनग्रेव्हिंग/कोरीवकामात त्यांचा उल्लेख आहे) :

1- BIS हॉलमार्क : हे सूचित करतो की शुद्धता परवानाप्राप्त प्रयोगशाळांपैकी एकामध्ये पडताळली आहे.

2 – कॅरेटमधील अचूकता (दिलेल्या कॅरेटेज केटीशी संबंधित)

  • 22K916 (91.6% शुद्ध)
  • 18K750 (75% शुद्ध)
  • 14K585 (58.5% शुद्ध)

3 – परख आणि हॉलमार्किंग केंद्राचे चिन्ह.

4 – ज्वेलरचे विशिष्ट ओळख चिन्ह.

24 कॅरेट सोन्याचे दागिने का बनवू शकत नाही? :

शुद्ध सोने किंवा 24 कॅरेट सोने नैसर्गिकपणेच अतिशय मऊ असते. यामुळे क्लिष्ट डिझाईन्ससह कोणतेही दागिने बनवणे कठीण होते, म्हणून बहुतेक लोक दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोने किंवा BIS 916 सोने निवडतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title : Gold Hallmarking | mandatory gold hallmarking rollout smooth in 256 districts planning for wider implementation government

 

हे देखील वाचा :

Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज

 

Related Posts