IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest rate 

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Gold Silver Price Today | मागील पाच महिन्यापासून सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price Today) घसरले आहेत. तेव्हापासून सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु. गेल्या दोन दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज (सोमवार) सोने आणि चांदीचे दर वधारले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,290 रुपये पर्यंत पोहचला आहे. तर चांदीचा दर (Silver Price) 67,200 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आता सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) वधारले असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे. गेल्या ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 48,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर होती. आज ती वाढुन 48,290 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे. दरम्यान, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी सोन्याचा दर कमीच आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचे सोन्याचे दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 447,290 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,620 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,290 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,290 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,290 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,290 रुपये

आजचा चांदीचा भाव – 67,200 रुपये ( प्रति किलो)

 

Web Title: gold rate price today on 15 november 2021 forecast outlook silver price rate today

 

हे देखील वाचा :

Diabetes | आंधळेपणा-किडनी फेल, ‘या’ 6 अवयवांना सर्वप्रथम डॅमेज करतो डायबिटीज

Amazon | अ‍ॅमेझॉनवर कढीपत्त्याच्या नावाखाली गंजाची तस्करी, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश; जाणून घ्या प्रकरण

Diabetes | हाता-पायांची सूज सुद्धा आहे अनियंत्रित मधुमेहाचा इशारा, ‘या’ 10 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

 

Related Posts