IMPIMP

Pune Crime News | ‘चिक्या’ भाईला शिव्या दिल्याच्या कारणावरुन दोघा युवकांवर चाकूने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Attempt To Kill Murder Sahakar Nagar Police Station Pune Crime News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | आमच्या चिक्या भाईला का शिव्या देतो, असे म्हणून तीन ते चार जणांच्या टोळक्याने दोघा युवकांवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा (Attempt To Kill) प्रयत्न केला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी हर्षद नितिन खिलारे (वय १८, रा. गुलटेकडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांची चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तळजाई पठार येथील सेल्फी पॉईंटवर रविवारी दुपारी साडेचार वाजता घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचे मित्र सेल्फी पॉईंटवर फोटो काढत असताना फिर्यादीच्या ओळखीचा भोसले इतर आरोपींसोबत आला.
त्याने तु आमच्या चिक्या भाईला का शिव्या देतो, असे म्हणून शिवीगाळ केली. लाथाबुक्यांनी मारहाण केली.
भोसले याने हातातील चाकूने फिर्यादी यांच्या बरगडीजवळ वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र अतिश पाटोळे हा मध्ये आला असताना इतरांनी त्याला पकडले.
भोसले याने चाकूने त्याच्या पाठीवर, बरगडीवर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
चाकू हवेत फिरवून लोकांना शिवीगाळ करुन कोणी मध्ये आले तर त्यालाही असेच खलास करु,
अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यामुळे लोक पळून गेले.
पोलिसांनी चौघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक खंडाळे तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Attempt To Kill Murder Sahakar Nagar Police Station Pune Crime News

 

हे देखील वाचा :

Mallika Sherawat | मल्लिकाने अंदमान येथील ‘ताज’ हॉटेलमधील बोल्ड फोटो केले शेअर; चाहते झाले घायाळ

Bigg Boss Marathi 4 Winner | बिग बॉस मराठी 4 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर अक्षय केळकरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

MP Vinayak Raut | राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर खासदार विनायक राऊतांची टीका, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी सुपारी घेऊन…’

 

Related Posts