IMPIMP

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

by nagesh
Government Employees Strike | old pension scheme govt employees strike back govt positive to implement old pension scheme with retrospective effect

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन   Government Employees Strike | जुन्या पेन्शनसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचाऱ्यांनी संप
पुकारला आहे. या संपामुळे अनेकांना फटका बसला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधान भवनात एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर
तोडगा निघाला असून संप (Government Employees Strike) मागे घेण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी मागील सात दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करावी यासाठी संप पुकारला (Government Employees Strike) होता. आता तो मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून (Coordinating Committee) सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

राज्यात अवकाळी पावसामुळे जी कामे प्रलंबीत आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे समितीने सांगितले आहे.
त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्या (मंगळवार) पासून कामावर हजर रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या सात दिवसांपासून संपावर होते.
आता संपकरी आणि सरकारमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याचे समजतं. संपकऱ्यांच्या या मागणीसाठी राज्य सरकारने
(State Government) एक अभ्यास समिती स्थापन केली असून पुढील तीन दिवसांत त्याचा अहवाल देण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Government Employees Strike | old pension scheme govt employees strike back govt positive to implement old pension scheme with retrospective effect

 

हे देखील वाचा :

Satara Crime News | औषधाच्या बिलात फेरफार करत हॉस्पिटलला 62 लाखाचा गंडा; चौघांविरुद्ध FIR

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ प्रकरणात राऊतांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार, दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा संतप्त सवाल (व्हिडिओ)

 

Related Posts