IMPIMP

HDFC Bank देतंय 10,000 रुपयांची ‘ही’ ऑफर, तात्काळ जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ?

by nagesh
HDFC Bank Hike MCLR | hdfc bank hike mclr on loan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था HDFC Bank | जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. HDFC Bank ने सणासुदीचा काळ (Festive season) लक्षात घेऊन फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 ची घोषणा केली आहे. बँक कार्ड, कर्ज आणि सोप्या EMI वर 10,000 पेक्षा जास्त ऑफर (Festival offer) देत आहे. बँकेने आपल्या वक्तव्यात म्हटले की, फेस्टिव्ह ट्रीट्स 3.0 अभियानांतर्गत 100 पेक्षा जास्त ठिकाणांवर 10,000 पेक्षा जास्त व्यापार्‍यांसोबत भागीदारी केली आहे (HDFC 10,000 Rs. Festive Treats 3.0 offer).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

ऑफर अंतर्गत बँक ग्राहकांना प्रीमियम मोबाइल फोनवर कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआय, 22.5 टक्केपर्यंत कॅशबॅक देईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि कंझ्युमर प्रॉडक्ट जसे की, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरवर नो-कॉस्ट ईएमआय आणि तात्काळ डिलिव्हरीसह 10.25 टक्केने सुरू होणार्‍या पर्सनल कर्जाचा समावेश आहे.

 

काय म्हटले बँकेने?
बँकेने म्हटले की, ग्राहक 7.50 टक्केने शून्य फोरक्लोजर शुल्क आणि दुचाकी कर्जावर 100 टक्केपर्यंत आणि व्याजदर चार टक्केसह कार लोनचा लाभ घेऊ शकतात. तर, ट्रॅक्टर कर्जावर 90 टक्केपर्यंत प्रोसेसिंग शुल्क आणि कमर्शियल वाहन कर्जावर प्रोसेसिंग शुल्कात 50 टक्के सूट आहे.

 

खरेदीची आहे मोठी अपेक्षा
बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारत असल्याने सणासुदीच्या काळात खरेदीची अपेक्षा बँकेने व्यक्त केली जात आहे. बँकेने अ‍ॅपल, अमेझॉन, शॉपर्स स्टॉप, एलजी, सॅमसंग, सोनी, टायटन आणि सेंट्रलसह व्यापार्‍यांसोबत भागीदारी केली आहे.

 

Web Title :- HDFC Bank | hdfc bank has unveiled more than 10k offers on cards loans and emi check details

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case |’क्रूझ ड्रग्स पार्टीवरील छापा बनावट, या मागे भाजप’; आघाडी सरकारमधील मंत्र्याचा स्फोटक दावा (व्हिडिओ)

Modi Government | मोदी सरकार आणणार जेष्ठ नागरिकांसाठी ‘बेस्ट पेन्शन योजना’; मिळणार निश्चित परतावा; जाणून घ्या

MP Supriya Sule | शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – खा. सुप्रिया सुळे (व्हिडीओ)

 

Related Posts